Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
Uncategorized

शिक्षणाचा पाया मजबुत असल्यास आयुष्य सोनेरी – डॉ. कडुकर

By adminmandand
July 10, 2026 2 Min Read
0

म्हसवड दि.१०
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच गुरूजणांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचा पाया मजबूत करून आयुष्याचं सोनं करावे असे आवाहन अप्पर जिल्हा अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर यांनी केले.
म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी डी वाय एसपी रणजीत सावंत सपोनि संदीप पोमण क्रांतिवीर नागनाथ अण्णा विद्यालयाच्या सचिव सौ. सुलोचना विश्वंभर बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना कडूकर म्हणाल्या ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले आहे त्यांना या यशाची नशा कायम अंगात राहिली पाहिजे हे यश नेहमी डोक्यात दिले पाहिजे तरच भविष्यात विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे सोपे जाते आपल्याला चांगले गुरूजण लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे.
या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षे मध्ये मुलींची संख्या जास्त दिसून येत आहे परमेश्वराने स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव कधीच केला नसून सर्वांना बुद्धी सारखीच दिलेली असते त्याचा सर्वांनी चांगल्या प्रकारे वापर करून देह साध्य करावे मी जेव्हा शालेय शिक्षण घेत होते तेव्हा चौथी व सातवी ला स्कॉलरशिप स्पर्धा होत्या मी चौथीपासून ते मेडिकल कॉलेजपर्यंत स्कॉलरशिप वर शिक्षण पूर्ण केले याचा मला अभिमान आहे.
आपणही शालेय जीवनापासून स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा या माध्यमातून स्वावलंबी शिक्षण घेत यूपीसी एमपीसी परीक्षांच्या माध्यमातून आपल्या पायावर उभे राहणे हे ध्येय असणे गरजेचे आहे नाहीतर मग मुलींची लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याकडून किंवा मुलांकडून मदत मागण्यापेक्षा आत्ताच आपल्या गुरुजनांच्या कडून योग्य मार्गदर्शन घेऊन सोशल मीडियावर चा वेळ कमी करून कुठेही वाहवत न जाता आपल्या आयुष्याचे सोने करावे असे आवाहन कडुकर यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी विद्यालय तसेच मेरी माता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतिवीर नागनाथ यांना विद्यालयाचे शिक्षक अभिजीत सावंत यांनी केले तर आभार सपनि संदीप पोमन यांनी मानले.

Post Views: 3
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.

Next

मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण
  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण
  • शिक्षणाचा पाया मजबुत असल्यास आयुष्य सोनेरी – डॉ. कडुकर
  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme