Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
प्रशासनराजकारण

मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण

By adminmandand
July 11, 2026 3 Min Read
0

म्हसवड दि. ११
जांभुळणीसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा व अभ्यासिकेची घोषणा; ९१ नवीन पोस्ट ऑफिसमुळे माढा मतदारसंघाने रचला विकासाचा नवा इतिहास
जांभुळणी (ता. माण) : जांभुळणी गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा ऐतिहासिक क्षण शनिवारी अनुभवायला मिळाला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावाला स्वतंत्र पोस्ट ऑफिसची भेट मिळाली आणि “मुक्काम पोस्ट जांभुळणी” अशी नवी अधिकृत ओळख प्राप्त झाली. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण उत्साहात पार पडले. यावेळी कराड डाक विभागाच्या अधीक्षक श्रीमती स्वाती दळवी प्रमुख उपस्थित होत्या.
येथील नवीन पोस्ट ऑफिसच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी, महिला आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सकाळपासूनच गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. जांभुळणी येथील गजी मंडळाने पोस्ट ऑफिससमोर पारंपरिक गजी नृत्य सादर करून जल्लोष साजरा केला. खासदार मोहिते-पाटील यांच्या आगमनावेळी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
प्रास्ताविक करताना सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी सांगितले की, “आजचा दिवस जांभुळणीच्या इतिहासातील अभिमानाचा दिवस आहे. ‘मुक्काम पोस्ट जांभुळणी’ ही केवळ नवीन ओळख नसून गावाच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. यासाठी खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”
ते पुढे म्हणाले की, पोस्ट ऑफिस हे नागरिकांच्या आर्थिक बचतीचे आणि सुरक्षित गुंतवणुकीचे केंद्र आहे. मात्र गावातील तरुणांच्या भविष्याचीही गुंतवणूक व्हावी, या उद्देशाने जांभुळणी येथे अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत खासदार मोहिते-पाटील यांनी जांभुळणीसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा आणि सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
महेश करचे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माढा लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल ९१ नवीन पोस्ट ऑफिस मंजूर झाली असून, हा ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अभिमानास्पद टप्पा आहे.

“पोस्ट ऑफिस म्हणजे आता फक्त टपाल सेवा नाही, तर तुमची विश्वासार्ह बँक” — खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील

खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील यांनी आपल्या मनोगतात ग्रामस्थांना भावनिक साद घालत सांगितले, “जांभुळणीने जसं माझ्या आजोबांवर प्रेम केलं, माझ्या चुलत्यांवर प्रेम केलं, तसंच प्रेम माझ्यावरही कायम ठेवा. हे प्रेमच मला अधिक काम करण्याची प्रेरणा देतं.”

त्यांनी नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत म्हटले, “पोस्टातील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित आहे. तुमची बचत कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आज पोस्ट ऑफिस ही केवळ टपाल सेवा देणारी संस्था राहिलेली नाही, तर ती सर्वसामान्यांची विश्वासार्ह बँक बनली आहे. येथे बचत योजना, विमा योजना, पेन्शन योजना तसेच विविध आर्थिक सुविधा उपलब्ध आहेत. केंद्र किंवा राज्य सरकारकडून विविध योजनांमधून मिळणारे लाभ तात्काळ खर्च न करता पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवा, बचत करा आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा.”

यावेळी त्यांनी जांभुळणीशी असलेल्या आपल्या कुटुंबाच्या जिव्हाळ्याच्या नात्याचाही उल्लेख केला. “मोहिते-पाटील कुटुंबाचे जांभुळणीशी तीन पिढ्यांचे नाते आहे. सहकारमहर्षी स्व. शंकरराव मोहिते-पाटील, मा. विजयसिंह मोहिते-पाटील आणि मा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही या पवित्र भूमीला वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. आमच्या कुटुंबाची श्री भोजलिंग देवस्थानावर अपार श्रद्धा आहे. अशा जांभुळणीला नवीन पोस्ट ऑफिसची भेट देता आली, याचा मला मनापासून आनंद आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ तोरणे यांनी केले, तर दयाराम गोरवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘मुक्काम पोस्ट जांभुळणी’ ही नवी ओळख, व्यायामशाळा व अभ्यासिकेची घोषणा, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांबाबत खासदारांनी केलेले मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा लोकार्पण सोहळा जांभुळणीच्या विकास प्रवासातील ऐतिहासिक आणि संस्मरणीय पर्व ठरला. यावेळी तेजसिंह राजेमाने, किशोर सोनावणे, दहिवडीचे नगरसेवक सुरेंद्र मोरे, अण्णासाहेब मगर, प्रमोद खाडे उपस्थित होते.००

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण
  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण
  • शिक्षणाचा पाया मजबुत असल्यास आयुष्य सोनेरी – डॉ. कडुकर
  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme