क्रांतिवीर नागनाथअण्णा जयंती निमित्त म्हसवड मध्ये भव्य प्रभात फेरी.
म्हसवड दि. १५
समाज परिवर्तनाचे प्रणेते पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड मधील हजारो विद्यार्थ्यांनी काढलेली प्रभात फेरी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
हुतात्मा शिक्षण व उद्योगसमूहाचे शिल्पकार पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड मधील विविध शाखा तर्फे प्रभात फेरी म्हसवड गावात आयोजित केली होती. प्रभात फेरीच्या प्रारंभी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांचे हस्ते तीर्थरूप नागनाथ अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून म्हसवड गावातून फेरीचा शुभारंभ करण्यात आला.
पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णांचा विजय असो,., क्रांतिवीर नागनाथ अण्णा अमर रहे. याबरोबरच सामाजिक शैक्षणिक व वृक्षारोपण युक्त घोषणांनी म्हसवड शहर अक्षरशः दणाणून सोडले . या निमित्ताने सजवलेल्या वाहनात क्रांतिवीर नागनाथ अण्णा यांची भव्य प्रतिमा सुशोभित स्वरूपात ठेवलेली होती. मिरवणुकीत शाळेतील लेझीम पथक, बँड पथक तसेच झांज पथक सहभागी झाले होते.
मिरवणुकीत सहभागी झालेले हजारो विद्यार्थी, रंगीबिरंगी पोशाख, विविध वाद्याचा निनाद, फेटा बांधलेले लेझीम पथक , जोरदार घोषणाबाजी यामुळे यावर इत्यादी कारणामुळे क्रांतिवीर शाळेचे प्रभात फेरी म्हसवड मधील नागरिक व रहिवाशासाठी आकर्षणाची प्रतीक ठरले. भल्या मोठ्या प्रभात फेरी मधील सहभागाबद्दल तसेच नेटक्या व्यवस्थापनाबद्दल विविध स्तरातील अनेक मान्यवरांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन व कौतुक केले. क्रांतिवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने, क्रांतिवीर सीबीएसई चे प्राचार्य विन्सेंट जॉन , ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल लवटे, मुख्याध्यापिका पुनम जाधव, क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे,चंद्रकांत तोरणे त्याबरोबरच लेझीम पथक प्रमुख संजय यांनी प्रभात फेरी यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रभात फेरीमध्ये संकुलातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

