Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.

By adminmandand
June 1, 2026 3 Min Read
0

म्हसवड दि. १
आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना वेध लागतात ते स्वतःसाठी, घरच्यांसाठी कष्ट करून मोठे होण्याचे, श्रीमंत होण्याचे. पण एक दिव्यांग अवलिया याला अपवाद निघालाय. सन 2010 साली अचानक अपघातातून आलेल्या अपंगत्वच भांडवल न करता, रडत न बसता अनेकांची सावली बनलाय, अनेकांचा मायबाप बनलाय तर अनेकांचा आधार बनलाय. तो अवलिया आहे प्राध्यापक हिरा नामदेव राखुंडे. आज १ जुन रोजी याच अवलीयाचा वाढदिवस असुन यानिमीत्ताने त्यांच्या संघर्षमय जिवनाचा घेतलेल्या कार्याचा आढावा तुमच्यासमोर मांडत आहोत.

 


2010 साली उजवा पाय मांडी पासून खाली काढावा लागला. अचानक आलेल्या अपंगत्वातून उभ राहणं ही मुश्किल झालं होतं. मग चालन, काम करणं खूप दूर. नैराश्याच्या गर्तेत 2 वेळा आत्महत्येचा पण प्रयत्न केला पण दुर्दैवान त्यात यश आले नाही. मग ठरवलं चला आता नवीन जन्म मिळाला आहेच तर थोडं जगून बघू या. घरच्यांवर अवलंबून न राहता स्वतः साठी तरी काम करू या. नकली पायाने उभा राहिलो. कामही जमू लागलं. बघता बघता दोन रुपये जमवू पण लागल. मग ठरवलं आता उर्वरित आयुष्य माझ्यासारख्या इतरांना द्यायचं. तिथून पुढे लोकसेवा सुरू केली. आजपर्यंत अनेक गरजूंना शालेय साहित्य, अनेक दिव्यांग व्यक्तींना जगण्यासाठी लागणारे साहित्य, अनेक जणांना वैद्यकीय मदत इत्यादी अनेक कामे सुरू केली. परंतु पुन्हा एकदा संघर्ष वाट्याला आला. 2019 साली पाय काळा पडत चालला होता. असंख्य टेस्ट केल्यानंतर समजलं की पायामध्ये दोन धागे आतच राहिले आहेत. डॉक्टरांनी पुन्हा एकदा ऑपरेट करण्यास सांगितलं.

 

प्रा. गिरा राखुंडे

असंख्य प्रश्न मनात येऊ लागले. पुन्हा एक महिना रूबी हॉस्पिटल मधे ऍडमिट होऊन ते धागे बाहेर काढले. असंख्य वेदना, नकोसे झालेलं जीवन पण हार नाही मानली आणि पुन्हा एकदा पाय बदलून उभा रहुनखरं कार्य केलं ते शिक्षणाच्या सेवेत. हजारो विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी परीक्षेची पुस्तके, त्यांना मोलाचे मार्गदर्शन, काहीना घरी जाऊन तर काहीना स्वतःच्या घरी बोलावून दिवस रात्र न बघता शिकवणे, प्रत्येक वर्षी आई वडील नसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोफत दहावीचे, बारावीचे प्रश्नसंच वाटप, अनेकाना शाळेच्या, कॉलेजच्या फीची मदत अशी असंख्य कामं करत आलोय. जवळपास 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनीयर, अधिकारी स्वतःच्या हाताने घडवलय आणि ते ही अगदी निःस्वार्थ भावनेनं.

  1. गावी अनेक गरजूंना नीटची, सीईटी ची महागडी पुस्तके देत आलोय, जवळपास 6 लायब्ररीना ही सर्व पुस्तके मोफत दिली आहेत कारण गावाकडचा मुलगाही शहरी मुलाच्या ताकदीचा बनावा म्हणून. सुट्टीला गावी आलो की असंख्य शाळा कॉलेजेस ना भेट देऊन तिथल्या मुलांना पण मोफत नीट, सीईटी चे मार्गदर्शन देत आलोय. या सर्व अविरत सेवेचा प्रत्यय म्हणजे शिक्षक दिनदिवशी, गुरू पौर्णिमेला आशीर्वाद घेण्यासाठी मुलांच्या घरी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. हे पहिलं की वाटतं आपण जे करतोय ते सर्व सार्थकी लागतंय. मुंबईला आलेल्या अनेक कुटुंबाचा रोजचा जगण्याचा प्रश्न असताना मुले इंजिनीयर डॉक्टर करणे हे अगदी अशक्य वाटणार कामही शक्य करून दाखवलं आहे. अजून खूप काही करणार आहे. परमेश्वराणे जर जगण्याची संधी दिली तर नक्कीच असंख्य लोकांचा तारणहार बनणार.अनेकांच्या चेहऱ्यावरचं हास्य बनणार अशी भिष्म प्रतिज्ञाच या अवलीयाने घेतली असुन त्यादृष्टीनेच त्यांची वाटचाल सुरु आहे, त्यांच्या या वाटचालीस व वाढदिनास माणदंड च्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme