Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
प्रशासनराजकारणसामाजिक

गतीरोधकाचा प्रश्न हवेतच विरला, सोशीक जनतेची आभाळभर सहनशीलता

By adminmandand
May 17, 2026 3 Min Read
0

म्हसवड दि. १७ ( महेश कांबळे )
माण तालुक्याची जशी दुष्काळी म्हणुन ओळख आहे, तशीच शोषित तालुका म्हणुन ही आणखी एक ओळख आहे, ही ओळख येथील सामान्य जनतेच्या सहनशक्तीमुळे निर्माण झाली आहे, त्यातच म्हसवड ची जनता तर फारच सोशीक आहे, कोणीही यावे अन् टिकली मारुन जावे या म्हणी प्रमाणेच येथील जनतेला आजवर सर्वांनीच गंडवले असल्याने येथे फारशी प्रगती झालेली दिसुन येत नाही.
एखादी दुर्दैवी घटना घडल्यावर तेवढ्यापुरती हळहळ अन् तेवढ्यापुरती चर्चा आणी आंदोलनाची भाषा करणारी जनतेची मानसिकता येथील अधिकारी, पुढार्यांनी चांगलीच ओळखली असल्याने तालुक्यातील चित्र फारसे काही बदलले नाही. गत अठवडयात म्हसवड शहरातील एक सुपरिचित अशा राकेशच्या अपघाती मृत्युमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली ही हळहळ व्यक्त करताना राकेशच्या अपघाताला गतिरोधक नसल्यानेच मुृत्यु झाल्याची चर्चा सर्व शहरात सुरु होती, त्याचवेळी शहराला जोडणार्या सर्व रस्त्यांवर गतीरोधक उभारले गेले पाहिजे अशी ही चर्चा शहरात रंगली ही चर्चा एवढी जोरात शहरात सुरु होती की त्यावेळी यासाठी येथील नागरिक आता रस्त्यावर उतरतील असे वाटत होते, मात्र ही म्हसवड ची जनता आहे, ती नेहमी आधी कोण सुरुवात करतोय हेच पहात आली आहे, यावेळीही नेमके तेच झाले राकेशच्या दुर्दैवी मृत्युमुळे ऐरणीवर आलेला गतीरोधकाचा प्रश्न हळुहळु बाजुला पड़ गेला, एकादी दु:खद घटना घडल्यानंतर एखाद्या कुटुंबावर ज्याप्रमाणे आघात होतो त्यानंतर त्या कुटुंबाला धीर दिला जातो त्यानंतर ते कुटुंब हळुहळु त्यातुन सावरते अगदी त्याप्रमाणेच म्हसवड शहराची गाथा आहे, एखादी गंभीर घटना घडली की नुसती त्यावर मोठ, मोठी चर्चा करायची आणी नंतर हळुहळु त्यावर पडदा टाकायचा ही मानसिकता येथील नागरीकांची आहे, ही मानसिकता येथील सर्व नेत्यांनी व अधिकार्यांनी नेमकी ओळखली असल्यानेच म्हसवडकर काय करतील फार, फार तर ओरडतील, चर्चा करतील आणी नंतर शांत बसतील हा चांगलाच समज सर्व नेत्यांचा व अधिकार्यांचा झाला असल्यानेच म्हसवडकरांना हक्काचे आजवर कधी मिळालेच नाही, ना ते मिळवण्यासाठी म्हसवडकरांनी कधी हक्काने प्रयत्न केला नाही ना त्यासाठी कधी आंदोलन उभारले नाही त्यामुळे आजवर येथील जनतेला सर्वांनी गृहीत धरुनच आपली मनमानी केली आहे.
आज अशा अनेक घटना शहरात घडत आहेत मात्र त्यावर फक्त चर्चा केली जाते पण चुकीला चुक म्हणण्याचे धाडस येथील जनता करीत नसल्याने सर्व अधिकारी व नेत्यांचे फावते आहे, खरेतर घटनेने सामान्य जनतेला फार मोठे अधिकार बहाल केलेले आहेत त्याचा कधी सामान्य जनतेने वापरच केला नाही, येथील जनता आपण भले आणी आपले काम भले यातच धन्यता मानत आली आहे. त्यामुळे शहरात कोणी अपघाताने मरो अथवा १०/१२ दिवसांतुन पिण्याचे पाणी मिळो, किंवा विजेचा लंपडाव असो, अथवा वैद्यिकय सेवेचा खेळखंडोबा होवो, या सह इतर अनेक समस्या असो यावर मात्र सर्वजण नेहमीच मौन बाळगण्यात धन्यता मानत आले आहेत. म्हसवडकरांचे हे मौन अधिकार्यांना व नेत्यांना त्यांची मनमानी करण्यास कारणीभुत ठरत आहे, प्रत्येक घटनेचा येथील जनता संबधितांना जेव्हा जाब विचारायला चालु करेल तेव्हाच म्हसवडकरांना त्यांचा हक्क मिळेल अन्यथा एखादी गंभीर घटना घडल्यावरच ही जनता तेवढ्यापुरती चर्चा करेल आणी विषय सोडुन देईल असेच जर होत राहिले तर शहरात साधे गतीरोधक होणे ही दुरापास्त होईल त्यासाठी अनेक राकेशसारख्या तरुणांचे बळीही जातील, भविष्यात असे बळी न जाण्यासाठी म्हसवडकरांनी आता आपल्या न्याय व हक्कासाठी कोणत्याच राजकिय पक्षाचा झेंडा हातात न घेता सिध्दनाथाचे निशान हाती घेवुन संघटित व्हावे आणी आपले प्रश्नाची सोडवणुक करुन घ्यावी वेळ प्रसंगी संबधितांना जाब विचारण्याची हिम्मत दाखवावी तरच म्हसवडकरांना गृहीत धरण्याची हिम्मत कोणी करणार नाही.
शेवटी ही नाथ नगरी आहे येथे अति ची नेहमीच माती झाली आहे, त्यामुळे म्हसवडकरांच्या सहनशिलतेचा अंत कोणीही पाहु नये हेच महत्वाचे.

High voltage towers in the dusk of the evening

Post Views: 3
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर; “पाणी घोटाळा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही” म्हसवडमध्ये महिलांचा मोठा सहभाग; आंदोलनानंतर शेतकऱ्यांचे रक्तदान

Next

सातारा – पंढरपुर महामार्गावर रंबलर उभारण्यावर सकारात्मक चर्चा, धट यांच्या प्रयत्नाला यश

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme