Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

एजन्सीबाहेर ग्राहकांच्या गँससाठी रांगा

By adminmandand
March 12, 2026 2 Min Read
0

म्हसवड दि. १२ ( महेश कांबळे )
मध्य आखाती देशात सुरु असलेल्या युध्दाची झळ भारातातील मोठ्या शहरांपासुन ते अगदी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेलाही आता बसु लागल्याचे चित्र सर्वत्र दिसु लागले आहे, युध्दाचे सर्वाधिक परिणाम हा गँस वर जाणवु लागल्याने घरगुती वापरासाठी मिळणारा एल.पी. जी. गँस पुरवठा करणार्या गँस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
युध्दाची झळ जगभरातील सर्वच देशांना बसु लागली असुन भारातालाही याचा फटका बसत आहे, देशातुन आखाती देशात जाणारा शेतमाल, व फळे ही बंदरावरच अडकुन पडली असल्याने देशातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. अशातच आता एलपीजी गँस वितरणावर या युध्दाचा गंभीर परिणाम झालेला पहावयास मिळत आहे, मोठ मोठ्या हॉटेल, इंटस्ट्रीजमध्ये वापरल्या जाणार्या एल.पी.जी. गँस सिलेंडर चा पुरवठा बंद झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत, तर अनेकांनी आपल्या हॉटेल बाहेर आता चुलीवरचे जेवन मिळेल असे फलक लावण्यात सुरुवात केली आहे, याचा परिणाम हा आज ना उद्या घरगुती गँस सिलेंडरवरही होईल अशी भिती सामान्य गँस ग्राहकांना वाटु लागल्याने गँस सिलेंडर मिळवण्यासाठी सर्व एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
म्हसवड शहरात असलेल्या शुभम भारत गँस एजन्सीबाहेर ही ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र असले तरी अद्याप याठिकाणाहुन एकाही गँस ग्राहकाला सिलेंडर मिळाला नाही असे घडले नसल्याने गँस ग्राहकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एजन्सी मार्फत घरपोच सिलेंडर वितरण सध्या थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत असुन यामध्ये गैर प्रकार होवु नये यासाठी हा निर्णय एजन्सी चालकांनी घेतला असल्याचे समजते. मात्र ज्याप्रमाणे व्यावसायिक गँस सिलेंडर ची विक्री बंद झाली आहे त्याप्रमाणेच घरगुती गँस सिलेंडर ही बंद होईल अशी भिती सर्वसामान्य गँस ग्राहकांना वाटु लागल्याने गँस सिलेंडर मिळवण्यासाठी हे ग्राहक एजन्सीबाहेर गर्दी करु लागल्याचे दिसुन येते. अशातच गँस पुरवठा करणार्या कंपन्यांनी गँस वितरणात काही अटी घातल्याने सामान्य ग्राहकांचा अधिकच गोंधळ उडाला आहे. पूर्वी गँस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना २१ दिवसाची अट होती ती आता शहरी भागासाठी २६ दिवसांची तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ४५ दिवसांची केली आहे, तर प्रत्येक ग्राहकांची KYC ही कंपनी ने बंधन कारक केली आहे, ज्यांची नसेल त्यांचे बुकींगच होत नसल्याचे समोर येत आहे. तर प्रत्येक गँस ग्राहकाला वर्षातुन १२ सिलेंडर दिले जातात त्याप्रमाणे ज्यांचे १२ झाले आहेत त्यांचेपण बुकिंग होत नसल्याचे दिसुन येते, मात्र गँस ग्राहकाला याची संपूर्ण माहिती नसल्याने त्यांच्या गोंधळात अधिकच भर पडत आहे. ग्राहकांचा हा गोंधळ कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील सर्व गँस एजन्सीला योग्य त्या सुचना दिल्या आहेत, त्यानुसार जिल्हाधिकार्यांच्या सुचनानुसारच गँस ग्राहकाला गँसचा पुरवठा सुरु असल्याचे येथील एजन्सीच्या सुत्रांकडुन सांगितले जात आहे.०००

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

क्रांतिवीर संकुलात नारी शक्तीचा एल्गार

Next

गँस सिलेंडर ने जाग्या केल्या कोरोनातील आठवणी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme