Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

म्हसवड शहरात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात साजरा दर्शनासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

By adminmandand
March 20, 2026 2 Min Read
0

 

म्हसवड दि. २०
म्हसवड शहरात असलेल्या श्री. स्वामी समर्थ मंदिरात स्वामींचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थित साजरा करण्यात आला, यावेळी दर्शनासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलुन गेला होता.
     २१ वर्षापुर्वी म्हसवड शहरात उभारलेल्या श्रींच्या या मंदिरात नित्यनियमाने मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वांमीच्या मुर्तीचे पूजन केले जाते. २१ वर्षापुर्वी म्हणजे १३/२ २००५ रोजी म्हसवड शहरात श्री. स्वामींचे मंदिर उभारण्यात आले असुन तेव्हापासुन आजअखेर निरतंर येथे सेवा सुरु आहे. म्हसवड शहरातील स्वामी भक्तांकडुन म्हसवड ते अक्कलकोट याठिकाणी पायी दिंडी जात होती, त्यावेळी दिंडीतील भाविकांना स्वामींनी दृष्टांत देत मला तुमच्या गावी न्या असा संदेश दिल्यानेच शहरात मंदिराची प्रतिष्ठापणा करण्यात आल्याचे मंदिराचे विश्वस्त चंद्रकांत जंगम ( गुरुजी ) यांनी सांगितले.
     मंदिर स्थापनेपासुन वर्षानुवर्ष भाविकांना जसजशी स्वामांची प्रचिती येवु लागली आहे, तसतशी प्रत्येक वर्षी येथे मोठी गर्दी वाढत असुन प्रकट दिन निर्वाण दिन या सह प्रत्येक गुरुवारी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. स्वामींची अनुभुती अनेकांना येवु लागल्याने शहरात स्वामी भक्तांची संख्या मोठी आहे.
   प्रकट दिनानिमीत्त मंदिरात सकाळी ७ वा. स्वामींना महाभिषेक करण्यात आला, त्यानंतर ८ वाजता स्वामींचा शहरातुन पालखी सोहळा संपन्न झाला, तर ठिक १२ वाजता स्वामींची आरती संपन्न होवुन फुलांचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ट, यावेळी स्वामींच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणुन गेला.०००

https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260320_121926924.mp4
https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260320_122341101.mp4
https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260320_122118071.mp4
Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड शहरात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात साजरा

Next

म्हसवड पालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचार्यांचे आमरण उपोषण सुरु

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme