म्हसवड दि. २४
म्हसवड नगरपरिषदेच्या सफाई कर्मचार्यांनी पालिकेचे आरोग्य निरीक्षक आपल्याला घरगड्या प्रमाणे वागणुक देवुन लज्जास्पद बोलत आहेत, त्यांच्याबद्दल वारंवार तक्रारी करुनही मुख्याधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत उलट त्यांच्या पाठीशी ठामपणे राहुन कर्मचार्यांवरच अन्याय करीत असल्याचा आरोप या सफाई कर्मचार्यांनी करीत पालिकेच्या समोरच प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरु केले आहे.
सफाई कर्मचार्यांनी सुरु केलेल्या या उपोषणाला महाराष्ट्र जननिकास माथाडी ट्रान्सस्पोर्ट आणी जनरल कामगार युनियन चे सचिव किशोर धुमाळ, म्हसवड चे माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे यांनी पाठींबा देत प्रत्यक्ष या आंदोलनात सहभागी झाले आहेत. म्हसवड पालिकेत २१ कायम सफाई कर्मचारी कार्यरत आहेत यापैकी ५ कर्मचार्यांनी हे आंदोलन सुरु केले असुन यामध्ये नितीन सरतापे, लैला गजानन सरतापे, निता सुनील चव्हाण, कल्पना सुधीर चव्हाण, व अर्चना विनोद सरतापे आदीजण सहभागी झाले आहेत.
दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना सदर आंदोलनाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर कर्मचार्यांनी यापुर्वी केलेल्या तक्रारीनुसार कर्मचार्यांना रोटेशननुसार काम दिले जात आहे, तर आरोग्य निरीक्षक यांच्याकडे त्यांचा थेट संबंध ही येत नाही यामध्ये मुकादम आता मध्ये आहे त्यामुळे कर्मचार्यांनी बिनबुडाचे आरोप करुन पालिकेची बदनामी करु नये, त्यांनी मागणी केल्यानुसार पालिकेने विषाखा समितीकडुनही संबधित आरोग्य निरीक्षकाची चौकशी केली असुन त्या समितीनेही आरोग्य निरीक्षक यामध्ये निर्दोष असल्याचा अहवाल पालिकेला सादर केला आहे.०००
