Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

म्हसवड शहरात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी, शहरात राम नामाचा जय घोष |

By adminmandand
March 26, 2026 2 Min Read
0

म्हसवड दि. ६
राम नवमी निमित्त राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, तसे म्हसवड शहरातही यानिमीत्त श्रीराम मंदीर येथेही केले जाते, तर येथील शशीकिरण देशमाने यांच्या निवासस्थानी असलेल्या श्रीराम मंदिरातील पाषाणरुपी प्रभु श्रीरामाच्या दर्शनसाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असतात, या ही वर्षी शहरातील अनेक भाविकांनी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात दर्शन घेतले.
सातारा जिल्ह्यातील म्हसवड शहरात शशीकिरण, डॉ. सचिन व अमोल देशमाने ही तीन भावंडे शहरातील सिध्दनाथ मंदिरासमोर एकत्रित रहावयास असुन त्यांच्या निवासस्थानी इ.स.सन १४ व्या शतकातील काळ्या पाषाणातील प्रभु श्रीरामाची मुर्ती आहे. या मुर्तीचा इतिहास मोठा असुन देशमाने कुटुंबियांनी या मुर्तीची प्रतिष्ठापणा आपल्या घरातील छोट्याशा मंदिरात केली आहे. दर रोज नित्य नियमाने प्रभु श्रीरामाची ते पुजा करीत आहेत, तर रामनवमी निमित्त त्यांनी महाप्रसादाचेही आयोजन केले होते. यानिमीत्त प्रभु श्रीरामाचा पाळणा उभारण्यात आला होता तर सश्राव्य अशा भजनाचाही कार्यक्रम ही आयोजित केला होता. दुपारी ठिक १२ वाजता प्रभु श्रीरामाच्या मुर्तीवर भाविकांकडुन पुष्पवृष्टी करण्यात आली तद्नंतर महिलावर्गाने प्रभु श्रीरामाला पाळण्यात घालुन पाळणा म्हटला त्यानंतर महा आरती संपन्न होवुन सर्वांनी प्रभु श्रीरामाच्या मुर्तीवर पुष्पवृष्टी केली तद्नंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आनंद लुटला.
दरम्यान या निमित्त देशमाने परिवाराकडुन रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते, यावेळी दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेत रक्तदान शिबीरातही सहभागी होत रक्तदान ही केले, तर या निमित्त देशमाने यांनी पहाटेपासुन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या निमित्त झरे ता. आटपाडी येथील संगीत विषारद महादेवीताई पारसे यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याला सरस्वती भजनी मंडळाने साद केली.

https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260326_113913827.mp4

https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260326_113211333.mp4

 

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने वाहनचालकांची पेट्रोल पंपावर धाव

Next

धुळदेव गावच्या हद्दीत भिषण अपघात, दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme