Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
प्रशासन

पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने वाहनचालकांची पेट्रोल पंपावर धाव

By adminmandand
March 25, 2026 2 Min Read
0

म्हसवड दि. २५
म्हसवड शहरातील पेट्रोल पंपावर २०० रुपयांच्या वर पेट्रोल दिले जात नसल्याने भयभित झालेल्या वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर आपल्या वाहनामध्ये इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी उसळत असल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
देशासह राज्यात इंधन तुटवडा जाणवत असताना आता गँस सिलेंडर मिळवताना मेटाकुटीला आलेल्या सामान्य जनतेला आता पेट्रोल, डिझेल च्या टंचाईचा सामना करावा लागत असुन पेट्रोल पंपावर प्रत्येक वाहनात फक्त २०० रुपयांचे पेट्रोल दिले जात असल्याने सामान्य जनता अधिकच गोंधळलेली आहे. अशातच गँस सिलेंडर प्रमाणे आता पेट्रोल, डिझेलही मिळणे बंद होणार असल्याच्या अफवेने या गोंधळात अधिकच भर पडली आहे, त्यामुळे सामान्य वाहन चालक पेट्रोल पंपावर आपली वाहने वळवु लागली असुन वाहनाची टाकी फुल करण्यासाठी गडबड करीत आहेत, एकाच वेळी अचानक अनेक वाहनांनी पेट्रोल पंपावर गर्दी केल्याने नागरीकांच्या घबराटीमध्ये अधिकच भर पडत आहे.
म्हसवड शहरात बुधवार दि.२५ रोजी शहराचा अठवडी बाजार असल्याने अगोदरच परिसरातील अनेक वाहने येथे येत असतात अशातच पेट्रोल, डिझेल बंद होण्याच्या अफवेने सर्व वाहनचालकांमध्ये अधिकच गोंधळ निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसुन आले, अशातच प्रती वाहन २०० रुपयांचे इंधन देण्याचा फतवा पेट्रोल पंपचालकांनी काढल्याने अधिकच गोंधळात भर पडली आहे.
दरम्यान सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी नागरीकांनी इंधन तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन करताना नागरीकांनी गोंधळुन न जाता पंपावर विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तर भारत सरकारच्या अख्यत्यारित असलेल्या सर्व पेट्रोल पंपावर मुबलक इंधनसाठा शिल्लक आहे, सध्याच्या युध्द जन्य परिस्थितीमुळे पेट्रोल कंपन्यांनी इंधन खरेदीसाठीची पॉलीसी मध्ये थोडासा बदल केला असल्याने पेट्रोल पंपावर इंधन येण्यास काहीसा विलंब होवु शकतो याचा अर्थ टंचाई आहे असा होत नाही नागरीकांनी पँनिक होवुन पंपावर गर्दी करु नये.

https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID-20260325-WA0312.mp4

 

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड बाजारात पेटल्या चुली

Next

म्हसवड शहरात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी, शहरात राम नामाचा जय घोष |

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme