Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
क्राईम

सातारा – सोलापुर महामार्गावर आणखी एक अपघात, पती – पत्नी गंभीर

By adminmandand
March 27, 2026 2 Min Read
0

 

म्हसवड दि. २७
सातारा–लातूर या राष्ट्रीयमार्गावरील माण तालुक्यातील पळशी फाटा परिसरात खराब आणि धोकादायक रस्त्यामुळे आणखी एक गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सविता रामचंद्र शेळके (वय 47) आणि रामचंद्र निवृत्ती शेळके (वय 52, मूळ गाव माळशिरस, सध्या राहणार सातारा) हे कामानिमित्त साताऱ्यात वास्तव्यास आहेत, ते आपल्या गावी माळशिरस येथे जात असताना माण तालुक्यातील पळशी फाटा येथे रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्याने त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला. परिणामी त्यांची गाडी रस्त्यावरून घसरून अपघात झाला.
या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर जयप्रकाश अवघडे या युवकाने तत्परता दाखवत जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्यांच्यावर डॉक्टर माधुरी कुचेकर यांनी तात्काळ प्राथोमोच्चार केले.

दरम्यान, सातारा–लातूर महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून मोठमोठे खड्डे, तुटलेले डांबरीकरण आणि अपुरी दुरुस्ती यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. या परिस्थितीसाठी रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाला जबाबदार धरले जात आहे.
तर सातारा – लातुर हा महामार्ग माण तालुक्यासाठी सध्या मृत्युमार्ग बनल्याचे दिसुन येत आहे, सकाळी याच महामार्गावरील खराब रस्त्यामुळे चारचाकीचा अपघात होवुन दोन जणांना आपला जीव गमवावा लागला असतानाच अन्य एका ठिकाणी याच महामार्गावर अपघात होवुन पती, पत्नी गंभिररित्या जखमी होण्याची घटना घडल्याने रस्ते विकास महामंडळावर नागरिक चांगलेच तोंडसुख घेत आहेत, तर या विभागाला जाग येईल काय असाही प्रश्न माण वासिय विचारु लागलेत.
स्थानिक नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, “रस्त्यांची वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. संबंधित यंत्रणेने त्वरित कारवाई करून रस्त्यांची दुरुस्ती करावी,” अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.०००

https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID-20260327-WA0309.mp4
https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID-20260327-WA0307.mp4
https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID-20260327-WA0308.mp4
Post Views: 3
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

धुळदेव गावच्या हद्दीत भिषण अपघात, दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी

Next

म्हसवड शहरात विजेचा लंपडाव सुरु, नागरिक हैराण

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme