म्हसवड शहरात विजेचा लंपडाव सुरु, नागरिक हैराण
म्हसवड दि. २७
म्हसवड शहरात गत काही दिवसांपासुन सातत्याने विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरीकांतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे, दिवसांतुन ८ ते १० वेळा विज पुरवठा खंडित होत असुन विजेच्या या लंपडावामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत, विज कंपनी ने सुरु केलेला विजेचा हा लंपडाव त्वरित थांबवुन नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा विज कंपनीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा विज ग्राहकांतुन दिला जात आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याने नागरिक हैराण होत आहे, अशात विज गायब होत असल्याने नागरिकांची तगमग होत आहे, विशेषत: लहान मुले व वृधांना यामुळे अधिक त्रास होत आहे. सध्या मार्च महिना सुरु आहे त्यामुळे विजबील भरण्यासाठी विज ग्राहकांना सातत्याने विज कंपनीकडुन विजबील भरण्याबाबात आवाहन केले जात आहे, तर सर्व सोशल मिडीयाच्या प्लॉटफॉर्मवरुन देखील विज ग्राहकांना विजबील भरण्यासाठी कंपनीकडुन आवाहन सुरु आहे, परंतु ज्याप्रमाणे विजकंपनी विज बील भरण्यासाठी ग्राहकांच्या पाठी लागत आहे त्याप्रमाणे अखंडीत विजपुरवठा करण्यावर ठाम का रहात नाही ? असा संतप्त सवाल विज ग्राहकांतुन विचारला जात आहे.
दिवसातुन ८/१० वेळा विज जात असल्याने नागरिकांना उकाड्यापासुन दिलासा तर मिळतच नाही अशात हवेत गर्मी वाढुन थोडेसे जरी ढगाळ वातावरण झाले किंवा वारे जरी सुटले तर विज गायब होत असल्याने नागरीकांतुन तीव्र रोष व्यक्त होत आहे. रात्री अपरात्रीही विज गायब होत असल्याने नागरिकांची अक्षरशा झोप उडाली आहे, विज वितरण कंपनी ने विज पुरवठ्याबाबात सुरु केलेला हा विजेचा खेळ त्वरित बंद करुन नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा विज कंपनी विरोधात विज ग्राहकांचे आंदोलन अटळ असल्याचे विज ग्राहकांतुन बोलले जात आहे.०००