Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

म्हसवडमध्ये ३ एप्रिल रोजी भव्य हिंदू संमेलन –

By adminmandand
March 30, 2026 1 Min Read
0

 

म्हसवड दि. ३०

  1. शहर व परिसरातील हिंदू समाजाच्या एकात्मतेसाठी, तसेच हिंदुत्व विचारांच्या जागृतीसाठी म्हसवड येथे ३ एप्रिल २०२६ रोजी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता म्हसवड बाजार पटांगण येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार असून, या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
    सकल हिंदू समाज, म्हसवड मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात विविध धार्मिक, सामाजिक व विचारप्रवर्तक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. हिंदू संस्कृतीचा गौरव, परंपरा आणि एकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
    या संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून योगी वृषभ नाथगिरी महाराज (जनरल थानापती, पंच दशनाम आवाहन आखाडा, उज्जैन) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कराड येथील श्री. विजयराव जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या भाषणातून समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला जाणार असून उपस्थितांना प्रेरणादायी विचार मिळणार आहेत.
    म्हसवड व परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी कुटुंबासह या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे सामाजिक एकोपा वाढण्यास आणि हिंदुत्व विचारांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    या भव्य संमेलनासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असून, शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी म्हसवड शहरातील सर्व हिंदु समाजाने उपस्थित रहावे यासाठी सकल हिंदु समाजातील कार्यकर्ते हे घरोघरी जावुन नागरीकांना आवाहन करीत आहेत.०००
    https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260330_124554788-1.mp4
Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड शहरात विजेचा लंपडाव सुरु, नागरिक हैराण

Next

स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळाच अव्वल, माण तालुक्यात जि.प. शाळाच आदर्श – लक्ष्मण पिसे

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme