Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
शैक्षणिक

स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळाच अव्वल, माण तालुक्यात जि.प. शाळाच आदर्श – लक्ष्मण पिसे

By adminmandand
March 31, 2026 2 Min Read
0

म्हसवड दि. ३१
माण तालुक्यात आदर्श शाळा म्हणुन म्हसवड शहरातील जिल्हा परषदेची शाळा क्र. ३ असुन या शाळेचे विविध उपक्रम हे जिल्हास्तरावर गौरवले जात असल्याने या प्राथमिक शाळेचा आपणाला सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी केले.
म्हसवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.३ येथे आयोजित विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, नगरसेवक युवराज सूर्यवंशी, नगरसेविका स्नेहल सूर्यवंशी, प्रमिला ढाले, मुख्याध्यापक काटकर, राजेंद्र तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी सदर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गितांवर भन्नाट नृत्य करीत उपस्थितांची मने जिंकत खाजगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही मागे नसल्याचे दाखवुन दिले.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी काहीना काही कला असतेच असते त्यांच्यातील ते सुुप्त गुण बाहेर येण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शालेय स्तरावर होणे गरजेचे आहे, आजवर खाजगी शाळांकडे शहरातील पालकांचा व विद्यार्थ्यांचा ओढा राहिलेला आहे, मात्र म्हसवड शहरात जिल्हा परिषदेची ही एक अशी शाळा आहे की या शाळेचा नावलौकीक जिल्ह्यात मोठा आहे, या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता ही अप्रतिम असल्यानेच आज ही शाळा माण तावुक्यात आदर्श शाळा बनली असुन या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकवर्ग शाळेकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ३ ही अव्वल व दर्जेदार तर आहेच, या शिवाय येथे डिजीटल क्लासरुम असल्याने विद्यार्थ्यांना संगणकाचेही ज्ञान येथे दिले जात आहे, आजच्या स्पर्धेच्या युगात पालकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण जरुर द्यावे मात्र त्यासाठी पैसे घालवु नये इयत्ता १ ली १० पर्यंतचे सर्व शिक्षण हे सरकारी शाळेतच विद्यार्थ्यांना द्यावे, व त्या शिक्षणाचा वाचलेला पैसा हा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी वापरावा असे आवाहन शेवटी गटशिक्षणाधिकारी पिसे यांनी केले.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी गितांमधुन सर्वोत्तम सामाजिक संदेश दिला, तर इयत्ता दुसरी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या युगातील मोबाईल एक प्रकारचे कसा व्यसन बनला आहे, तर पाणी वाचवा, झाडे जगवा असे सामाजिक संदेश ही या विद्यार्थ्यांनी गितांमधुन देत उपस्थितांची मने जिंकली यावेळी विविध मान्यवरांनी चिमुकल्यांच्या सादरीकरणाला बक्षिसे देवुन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाळांतर्गत होत असलेल्या विविध स्पर्धा परिक्षेतील अव्वल विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी म्हसवड शहरातील अनेक मान्यवर व पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.०००

https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260330_200339550.mp4
https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260330_195417916.mp4
https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260330_184702394.mp4

 

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवडमध्ये ३ एप्रिल रोजी भव्य हिंदू संमेलन –

Next

म्हसवड शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme