Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

म्हसवड शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

By adminmandand
March 31, 2026 1 Min Read
0

म्हसवड दि. ३१
सकल जैन समाजाचे दैवत असलेल्या भगवान महावीर यांची जयंती म्हसवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शहरातील सर्व जैन समाजाने एकत्र येत भगवान महावीर यांच्या मुर्तीची पालखीतुन शहरातुन सवाद्य मिरवणुक काढली, यावेळी पालखीचे स्वागत करण्यासाठी सर्व जैन समाजाने रस्त्यावर रांगोळी काढली होती, तर प्रत्येक समाज बांधवाच्या दारात हा पालखी मिरवणुक सोहळा जात होता, यावेळी जैन समाजाने अंहिसा परमो धर्म चा नारा शहरात दिला, पालखीचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी समाजबांधव घराबाहेर थांबले होते, पालखी सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचेही यावेळी आयोजन करण्यात आले, तर शहरतील इतर सर्वांना या समाजाने प्रसाद म्हणुन लाडुचे वाटप केले.
यावेळी म्हसवड शहरातील जैन मंदिराची विशेष आरास करण्यात आली होती, तर सकाळी भगवान महावीर यांच्या मुर्तीवर अभिषेक करण्यात आला, तदनंतर शहरातील आनंदीबाई कार्यालय येथे महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते, यावेळी सर्व जैन समाजाने भगवान महावीर यांच्या नावाचा जय घोष केला. जगाला शांततेचा संदेश देणार्या भगवान महावीर यांच्या विचाराचा वारसा सर्वांनीच अंगिकारावा असे आवाहन यावेळी समाजबांधवानी करीत आजच्या युध्द जन्य परिस्थितीत भगवान महावीर यांच्या शांततेच्या संदेशाची सर्व जगाला आठवण होत असल्याचेही यावेळी समाजबांधवांनी अधोरेखीत केले. यावेळी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शशीकिरण देशमाने, संतोष दोशी, डॉ. राजेश शहा, प्रवीण दोशी, जितेंद्र गांधी आदींनी विशेष परिक्रम घेतले.
दरम्यान शहरातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेतही भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुप्षहार घालण्यात आला, यावेळी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.०००

https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260331_093933645.mp4
https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260331_100318975.mp4
https://mandand.online/wp-content/uploads/2026/03/VID_20260331_093216307.mp4

 

Post Views: 4
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळाच अव्वल, माण तालुक्यात जि.प. शाळाच आदर्श – लक्ष्मण पिसे

Next

म्हसवड शहरात जोतीबा उत्सव उत्साहात संपन्न, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण
  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण
  • शिक्षणाचा पाया मजबुत असल्यास आयुष्य सोनेरी – डॉ. कडुकर
  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme