Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
धार्मिक

म्हसवड शहरात जोतीबा उत्सव उत्साहात संपन्न, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

By adminmandand
April 2, 2026 1 Min Read
0

म्हसवड दि. २
चैत्री पौर्णीमेनिमीत्त म्हसवड शहरात असलेल्या श्री. जोतीबा मंदिरात येथील दानवीर व्यापारी बाळासाहेब गोंजारी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शहरातील हजारो भाविकांनी जोतीबाचे दर्शन घेवुन महाप्रसादाचा लाभ घेतला.
म्हसवड शहरात सुमारे ३०० वर्षापुर्वीचे प्राचीन असे जोतीबा मंदिर असुन या मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम येथील माजी नगरसेवक विकास गोंजारी व त्यांचे बंधु बाळासाहेब गोंजारी या बंधु नी हाती घेतले असुन त्यांना या कामी येथील सणगर, माळी समाजाचे मोलाचे सहकार्य लाभ ले आहे, गत वर्षापासुन या बंधुनी येथील मंदिरात महा प्रसाद वाटण्यास सुरुवात केली असुन याला म्हसवडकर भाविकांतुन भरघोस प्रतिसाद मिळत आहे. तर चैत्री पौर्णीमेला दरवर्षी जोतीबा च्या डोंगरावर भरत असलेल्या यात्रेस सर्वसामान्य म्हसवडकर भाविकांना जाण्यास अडचण येत असल्याने शहरातील मंदिरात त्यांना सुलभ व सहज दर्शन घेता यावे याकरीता म्हसवड शहरातील जोतीबा मंदिरात छोटे – खाणी यात्रा भरवली जात आहे, यंदाचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी महादेव गोंजारी, मदन गोंजारी, शिवशंकर डमकले, सुभाष गोंजारी, गौरीहर फुटाणे, फडतरे, अशोक गुरव, लक्ष्मी गुरव, महादेव मिस्त्री आदींनी विशेष प्रयत्न केले. यावेळी मंदिरास आकर्षक अशी विद्युत रोषणाई व रंगरंगोटी करण्यात आली होती.०००

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Next

कडाडलेल्या विजेने घेतला शेतकर्याचा बळी, माण तालुक्यातील तोंडले गावातील घटना

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme