Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
प्रशासन

विस्कळीत पाणी पुरवठा लवकरच सुरळीत करणार – नगराध्यक्षा पुजा विरकर

By adminmandand
April 10, 2026 1 Min Read
0

म्हसवड दि. ९
म्हसवड शहरात गत काही दिवसांपासुन पालिकेकडुन केल्या जाणार्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यामध्ये काही प्रमाणावर विस्कळीतपणा जरुर आला असला तरी त्यावर पालिकेचे जोरदार काम सुरु आहे, ये त्या काही दिवसांतच शहरासाठी मंजुर असलेल्या नवीन पुरवठा योजनेतुनच शहरवासीयांना पिण्याचे पाणी सोडले जाणार आहे, फक्त त्या योजनेची टेस्टिंगचे काम बाकी आहे, तरी म्हसवड कर जनतेने पँनिक न होता काही दिवस पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या नगराध्यक्षा पुजा विरकर यांनी केले आहे.
म्हसवड शहरात नागरीकांना पालिकेकडुन होत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे येथील नागरीकांनी तक्रार दिली आहे, यावर स्पष्टीकरण देताना नगराध्यक्षा विरकर यांनी सांगितले की म्हसवड शहरासाठी केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम यापुर्वीच मंजुर असुन प्रत्यक्षात ते काम पुर्णही झाले आहे, त्या योजनेवरील जँकवेल येथे विद्युत पंप व ट्रान्सफार्मर बसवण्याचे काम पुर्ण झाले आहे, फक्त तेथील विद्युत प्रवाह सुरु करण्यासाठी विज कंपनीकडुन अंतिम मंजूरी अहवाल येणे बाकी असुन तो अहवाल प्राप्त झाल्यावर नवीन पाईपलाईनद्वारे पाणी टेस्टिंग केले जाईल यासाठी थोडासा अवधी लागणार असला तरी एकदा पाणी टेस्टिंग झाले की म्हसवडकरांना रेग्युलर पाणी पुरवठा सुलभपणे होईल.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे ही आवाहन शेवटी नगराध्यक्षा विरकर यांनी केले आहे.०००

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

पिण्याच्या पाण्याचे पालिकेचे नियोजन तोकडे, प्रा. बाबर यांचे थेट जिल्हाधिकार्यांनाच साकडे

Next

म्हसवड शहरातील उखरलेले रस्ते तातडीने दुरुस्त करावेत – प्रा. बाबर

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme