Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ – प्रा. कांगणे

By adminmandand
April 14, 2026 3 Min Read
0

म्हसवड दि. १४
ज्याला स्वत:च्या देशात पुस्तक वाचायला बंदी होती,त्याने परदेशात जावुन शिक्षण पुर्ण करुन पुन्हा आपल्या देशात येवुन एक असे पुस्तक लिहले, आज संपूर्ण भारत देश त्यांच्या पुस्तकावर चालतोय त्या पुस्तकाचे नाव आहे, संविधान, आणी त्याचे लेखक आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्याने हे संविधान वाचले त्याला जिवन जगता आले, जो त्यांच्या विचारावर चालतोय त्याला यशाचा मार्ग भेटतोय म्हणुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत की शिक्षण हे वाधिणीचे दुध आहे, जो हे दुध पिलाय तो गुरगुरणारच. डॉ. आंबेडकरांनी लिहलेले संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ असुन सर्वांनीच या ग्रंथाचा अभ्यास करावा असे आवाहन जेष्ठ व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केले, ते
म्हसवड शहरात डॉ. आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त म्हसवड येथील जयभिम युवक मंडळाच्या वतीने शहरात ११ एप्रील ते १४ एप्रील असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, पुस्तक प्रदर्शन, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम या जयंती निमित्त राबवण्यात आल्याने शहरातुन समाधान व्यक्त होत आहे, यावेळी म्हसवड पंचक्रोशीतील विविध स्पर्धा परिक्षेत ज्यांनी यशाचा झेंडा रोवला आहे, अशा सर्वांचा प्रा. कांगणे यांच्या हस्ते जयभिम युवक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. कांगणे यानी सत्कारमुर्तींनी जे यश मिळवले आहे ते यश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानामुळेच मिळवु शकले असल्याचे सांगत महिलांचे शोषण थांबवण्यासाठी त्यांनी घटनेत विविध कलमे लिहुन महिलांना सर्वत्र समान अधिकार दिले असल्याचे सांगितले. शिक्षण हा भारतातील सर्वांचा तो अधिकार आहे तो सर्वांना मिळावा यासाठी डॉ. आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार देण्याची घटना लिहली आहे. या देशाच एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा शिक्षणाच्या जोरावर विविध शासकिय कार्यालयात अधिकारी बनु शकतो हे फक्त माझ्या बाबासाहेबांमुळेच घडतंय, मागासवर्गीय जनतेचा विकास व्हावा त्यांचा सामाजिक स्तर उंचवावा यासाठीही बाबासाहेबांनी निवडणुक प्रक्रियेत या समाजासाठी आरक्षण ठेवले त्यामुळेच आज आमच्या दलितातुन आमदार, खासदास, कोणी मंत्री होत आहे, ही किमया फक्त आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेममळेच होवु शकली. आज महिला वर्ग पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्यरत आहे तो त्यांना घटनेने दिलेल्या अधिकारामुळेच.
महाराष्ट्र ही भुमी संताची, हुतात्म्यांची आणी शौर्याची आहे, छ. शिवाजी महाराजांची आहे या सर्वांनी कधीच बुवाबाजी केली नाही किंवा तशी शिकवण समाजाला दिली नाही, मात्र आज काल बुवाबाजी आणि भोंदुगिरीने राज्यात थैमान घातले आहे, रोज एक नवीन बाबा व त्यांचे कांड समोर येत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला अशा घटना शोभत नाही. आजची नारी ही सुशिक्षित असली तरी अशा भोंदुगिरीला त्याच बळी पडत आहे. आजच्या डिजीटल जमान्यात चमत्काराला थारा नाही त्यामुळे अशा प्रवत्ती वेळीच ठेचुन काढा असेही आवाहन शेवटी प्रा. कांगणे यांनी केले.
दरम्यान प्रा. कांगणे यांचे फटाके व ताशांच्या गजरात शहरात स्वागत करण्यात आले, यावेळी प्रा. कांगणे यांचे जयभिम युवक मंडळाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व संविधानाची प्रस्ताविका देवुन सन्मान करण्यात आला. प्रा. कांगणे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी म्हसवडकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर आज म्हसवड शहरात होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त होणार्या शोभा यात्रा व मिरवणुक सोहळ्यात उत्सव समितीचे अध्यक्ष सारंग लोंढे, उपाध्यक्ष प्रविण सरतापे, सचिव निलेश सरतापे यांनी सहभागी होण्याचे आवाहन जयभिम युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.०००

https://mandand.online/wp-content/uploads/2026/04/VID_20260413_212044095.mp4

 

Post Views: 4
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड शहरातील उखरलेले रस्ते तातडीने दुरुस्त करावेत – प्रा. बाबर

Next

सायकलवारी करुन डॉ. आंबेडकरांना अनोखे अभिवादन

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण
  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण
  • शिक्षणाचा पाया मजबुत असल्यास आयुष्य सोनेरी – डॉ. कडुकर
  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme