म्हसवड दि. १४
म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व शिंपी समाज सातारा जिल्हाध्यक्ष
इंजि.सुनील पोरे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त 50 किलोमीटर सायकलिंग करून अभिवादन केले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी गत 12 वर्षांपासून म्हसवड येथील शुभम भारत गॅस ऍजन्सीचे सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्ते इंजि.पोरे हे दरवर्षी 14 एप्रिलला गोंदवले बुद्रुक, 10 डिसेंबर ला शिखर शिंगणापूर येथे तर श्रावणातील पहिल्या आठवड्यात पंढरपूर येथे सायकल वरुन जात असुन त्यांची ही सायकलवारी त्यांनी छंद जोपासलाची असली तरी तो छंद प्रेरणा दाई असे अनेकजण म्हणत आहेत.
या ही वर्षी त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त मंगळवार दि.14 रोजी सकाळी 5 वाजता घरापासून सायकलिंग सुरू करून 6:30 वाजता दिड तासात गोंदवले येथे पोहचुन तेथील जयभीम युवक ऑर्गनायझेशन आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून महामहामानव बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
पुन्हा सकाळी 7 वाजता गोंदवले येथुन ते परत म्हसवडला सकाळी 8.15 वाजता पोहचले सव्वा तासात म्हसवडला सायकलवरुन केलेला त्यांचा हा प्रवास या वयातही अनेकांसाठी प्रेरणादाई असा असल्याने त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल बौद्ध बांधवांनी त्यांचे कौतुक केले.०००
