Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

म्हसवडकरांची तहान भागवण्यासाठी माणगंगा नदीत पाणी सोडा – प्रा. विश्वंभर बाबर

By adminmandand
April 23, 2026 2 Min Read
0

म्हसवड दि. २३
म्हसवड शहरवासीयांना पिण्याच्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून यावर उपाय म्हणून जिहे – कटापूर योजने अंतर्गतचे आंधळी धरणातील पाणी माणगंगा नदीत सोडावे अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
कमालीच्या उष्णतेमुळे माण तालुका अक्षरशा होरपळून निघाला आहे. म्हसवड शहरासह माण तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. नुकतीच माण पंचायत समितीनेही तालुक्यातील टंचाईग्रस्त गावाची यादी जाहीर केलेली आहे. प्रामुख्याने म्हसवड शहरवासीयांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून पिण्याचे पाणी आठ ते दहा दिवसांच्या अंतराने जनतेला मिळत आहे. त्यातच योजनेच्या फुटतुटीचा घोटाळा झाल्यास पुन्हा सदरचा कालावधी वाढतच आहे.
जनता शोषिक झाली असून नेतेमंडळी मूग गिळून गप्प आहेत. खात्रीशीर पाणी स्त्रोत्र उपलब्ध नसल्याने नेते व प्रशासन सुद्धा हतबल आहेत. सद्यस्थितीत राजकारण बाजूला ठेवून सर्व प्रमुख मान्यवरांनी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. प्रशासनापुढेही प्रभावी जलद उपाय नाही ही वस्तुस्थिती आहे. तत्पुरत्या मलमपट्टीच्या ऐवजी पिण्याचे पाणीपुरवठ्यासाठी ठोस उपाय योजना गरजेचे आहे.
म्हसवडची जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झालेली आहे तर नवीन योजना सुरू करण्यास अजून मुहूर्त मिळत नाही. संशोधन केल्यास नवीन पाणीपुरवठा योजनेवर भलं मोठं संशोधन होऊ शकेल. माणगंगा नदीत पाणी नसल्याने शेंबडे वस्ती पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा वाजलेले आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी हवालदिल झालेले आहे. अडात नाही तर पोहऱ्यात आणायचे कुठून ही प्राप्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुर्दैवाने माण तालुक्यातील अनेक गावात व प्रामुख्याने माणगंगा नदीच्या काठावरील बहुतांश गावांमध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे यावर उपाय एकच तो म्हणजे जीहे कटापूर योजने अंतर्गतचे आंधळी धरणातील अडवलेले हक्काचे पाणी केवळ पिण्याच्या पाणीपुरवठा मागणीसाठी माणगंगा नदीतून म्हसवड शेंबडे वस्ती पाणीपुरवठा बंधाऱ्यापर्यंत सोडणे किंवा वडजल कालव्यातून म्हसवडकडे माणगंगा नदीत पाणी आणणे अत्यंत गरजेचे आहे. आंधळी धरणात अडवलेल्या पाणीसाठ्यातून शेतातील पिकाचे हित पाण्याबरोबरच जनतेच्या पिण्याच्या पाणी मागणीला प्राधान्य देणे गरजेचे असून त्यासाठी आंधळी धरणात साठवलेले पाणी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी माणगंगा नदीत सोडावे अशी मागणी प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.

प्रा. विश्वंभर बाबर
Post Views: 3
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

पाण्यासाठी म्हसवडकरांचा टाहो, सत्ताधारी व प्रशासन ऐकेल का, हो

Next

पोमण न ठरो शोमँन, सामान्य जनतेची अपेक्षा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme