Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
शैक्षणिक

क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड चे उज्वल यश

By adminmandand
May 2, 2026 1 Min Read
0

म्हसवड दि. २
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ एच एस सी  परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून .या परीक्षेमध्ये क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड विज्ञान शाखेमध्ये कुमारी सेजल प्रवीण फडतरे हिने 80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल  अंतर्गत क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड मधील इयत्ता 12वी परीक्षा निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. ज्युनिअर शाखेचा एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल 98 टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांक व मिळालेले गुण
पुढीलप्रमाणे –  फडतरे सेजल प्रविण 80 टक्के, द्वितीय क्रमांक- लांब ओम दत्तात्रय 72 टक्के,
तृतीय क्रमांक – घुटुकडे सौरभ शांताराम 70 टक्के. विशेष म्हणजे म्हसवड पंचक्रोशी मध्ये टक्केवारी मध्ये सर्वात जास्त निकाल व वैयक्तिक टक्केवारी जास्त मिळवण्याचा बहुमान क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेजने पटकविला आहे
क्रॉप सायन्स या विषयात २०० गुणांपैकी मिळविलेले प्रथम क्रमांक- जावीर अनुजा दिपक 189 गुण
द्वितीय क्रमांक – कापसे शिवानी दिलीप 187 गुण
तृतीय क्रमांक – खांडेकर आशा सुखदेव 181 गुण.
माहिती व तंत्रज्ञान या विषयात 100 गुणांपैकी मेधा कृष्णराज जाधव प्रथम क्रमांक 97 गुण.
द्वितीय क्रमांक – घुटुकडे सौरभ शांताराम 96 गुण व सरतापे नेत्रा मनोज 96 गुण
तृतीय क्रमांक – कलढोणे अविनाश दत्तात्रय 92 गुण.
ज्युनियर कॉलेजमधील सर्व यशस्वी विद्यार्थांचे  संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर ,सचिव सौ. सुलोचना बाबर,
संस्था उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर, संचालक तात्यासाहेब औताडे, प्राध्यापिका शरयू देवकर ,
सौ. हर्षदा इंद्रजीत बाबर तसेच प्राचार्य विठ्ठल लवटे व सर्व शिक्षक, पालक  यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले केले.

Post Views: 3
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

निधी मिळुनही म्हसवडकर पितायेत १० दिवसांतुन पिण्याचे पाणी, ना. गोरे यांचे स्वप्न सत्यात उतरवण्याची पालिका सदस्यांची धडपड

Next

कुरणेवाडीतील दरोडा उघडकीस; सर्व आरोपी अटकेत, ९ मे पर्यंत पोलीस कोठडी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme