Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
क्राईम

कुरणेवाडीतील दरोडा उघडकीस; सर्व आरोपी अटकेत, ९ मे पर्यंत पोलीस कोठडी

By adminmandand
May 7, 2026 2 Min Read
0

म्हसवड दि. ७
म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील
वरकुटे-मलवडी परिसरातील कुरणेवाडी
गावच्या हद्दीत घडलेल्या दरोडा प्रकरणाचा उलगडा. करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांना अवघ्या अठेचाळीस तासांत यश आले. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे, तर यामध्ये दोनजण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी सातारा येथील सुधारगृहात करण्यात आली आहे.
कुरणेवाडी येथील प्रल्हाद मिसाळ व सुलाबाई मिसाळ या दाम्पत्याला निर्दयीपणे रविवारी मध्यरात्री मारहाण करून घरफोडी करण्यात आली होती. आरोपींनी पतीला जखडून ठेवत पत्नीच्या गळ्यावर सुरा ठेवून दहशत निर्माण केली होती. त्यानंतर पत्नीच्या गळ्यातील मणी-मंगळसूत्र, कानातील बुगड्या, कुडके, तसेच इतर साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व नऊ हजारांची रोकड लंपास करून आरोपी पसार झाले होते.
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. यातील दोन आरोपींना सांगली जिल्ह्यातील दिघंची येथून, तर इतर दोघांना माण तालुक्यातून अटक केली. दरोड्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले असुन एक दुचाकीसह रोकड जप्त करण्यात आली आहे.
या दरोड्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात होते. मात्र, पोलिसांनी सर्व आरोपींना पकडल्याने आता नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या दरोड्याचा संपूर्ण छडा लावण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली होती. म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली या दरोड्याचा अधिक तपास सुरू असुन संबधीतांकडुन आणखी काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची म्हसवड पोलीसांकडुन व्यक्त होत आहे. याप्रकरणी म्हसवड पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व संशयीतांची नावे पुढीलप्रमाणे
दादा आण्णा बुधावले, संजय आण्णा बुधावले (वय २३), महादेव आण्णा बुधावले (वय २२), हर्षद युवराज बुधावले (वय १९), ऋतिक भारत बनसोडे (वय २०) यांचा समावेश असून आणखी दोन अल्पवयीन युवक आहेत.
दरम्यान यातील दोन अल्पवयीन असल्याने त्यांची सातारा येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, तर उर्वरीत ५ आरोपींना म्हसवड न्यायालयाने ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

https://mandand.online/wp-content/uploads/2026/05/VID-20260507-WA0277.mp4
Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड चे उज्वल यश

Next

चार्या, पाण्याविना मुकी बछडी फोडतायेत हंबरडा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme