Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

चार्या, पाण्याविना मुकी बछडी फोडतायेत हंबरडा

By adminmandand
May 8, 2026 1 Min Read
0

म्हसवड दि. ८ ( महेश कांबळे )
माण तालुक्यातील म्हसवड येथे असलेल्या मेगासिटी लगतच्या वनीकरणात काही निर्दयी व्यक्तींनी जर्सी गायींची दोन बछडी आणुन सोडली आहेत, सध्या ही दोन खोंड चार्या व पाण्याविना तेथेच हंबरडा फोडत आहेत. याठिकाणाहुन जाणार्या रस्त्यावर येवुन ते थांबत असुन येथुन जाणार्या प्रत्येक वाहनाच्या पाठीमागे ते हंबरडा फोडत धावत आहेत, तर ये – जा करणार्या पादचार्यांच्याही ते मागे जात आहेत, जणु आम्हाला तुमच्या घरी न्या अशी ते विनवणी करीत आहेत.
सध्या बाजारपेठेत खोंडाना मागणी नसल्याने त्याची विक्री होत नाही म्हणुन पशुमालक अशा खोडांना आणुन सोडुन देत आहेत. पशुमालक त्यांना सोडुन मोकळे होत असले तरी अशा बछड्यांचे चारा, पाण्याविना होत असलेले हाल, त्यांचा यासाठी सुरु असलेला हंबरडा ऐकुन अनेकांना हळहळ वाटत आहे. सध्या ज्या परिसरात हे बछडे फिरत आहेत त्याठिकाणी भटक्या श्वानांचा मोठा वावर आहेच या शिवाय लांडगेही फिरत असल्याने ही बछडी त्यांची शिकार होण्यापुर्वीच वनविभागाने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची योग्य ती व्यवस्था करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खरे तर अशी निरागस खोंड यापुर्वी अनेकदा काही निर्दयीपणे कत्तलखान्याकडे जात होती, मात्र आता गावोगावी गो रक्षक निर्माण झाल्याने या मुक्या जनावरांचे प्राण निश्चित पणे वाचत आहेत, मात्र त्यांचे चार्या व पाण्याविना हाल होत आहेत. अशा जर्शा खोंडाना बाजारपेठेत मागणी नाही त्यामुळे त्याची विक्री होत नाही मग त्यांना नुसतेच संभाळायला कोणी पशुमालक तयार होत नाही म्हणुन ते अशा मुक्या जनावरांना अशा ठिकाणी मरणयातना भोगण्यासाठी सोडुन देत आहेत.
अशा ठग पशु मालकांवर कारवाई तर झालीच पाहिजे, या शिवाय वनविभागानेही ठिकठिकाणी सिसिटीव्ही बसवल्यास अशा प्रकारांवर आळा बसेल तर निर्दयी पशुमालकावर ही कारवाई करता येईल अशी मागणी जोर धरत आहे.

https://mandand.online/wp-content/uploads/2026/05/VID_20260508_071750324.mp4
Post Views: 3
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

कुरणेवाडीतील दरोडा उघडकीस; सर्व आरोपी अटकेत, ९ मे पर्यंत पोलीस कोठडी

Next

आत्मगिरी विद्यालयाचा १० वी निकाल १००%. स्वरांजली ढोले केंद्रात दुसरी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme