Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
प्रशासनसामाजिक

म्हसवड पालिका हद्दीतील सातारा – पंढरपुर रस्त्यावर गतिरोधक उभारावेत – इंजि. तिवाटणे

By adminmandand
May 22, 2026 3 Min Read
0

म्हसवड दि.२२
म्हसवड नगरपरिषद म्हसवड ह‌द्दीतून जाणार सातारा- पंढरपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून यामध्ये जीवितहानी होण्याचे प्रमाणही अधिक असून या रस्त्यावर आवश्यक ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी इंजि श्री. नितीनकुमार गजानन तिवाटणे यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वरील विषयानुसार दिं १० मे २०२६ रोजी सायंकाळी ७.५० वा सातारा-पंढरपूर रस्ता माळशिरस चौक येथे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटोरसायकल मुळे अपघात झाला व सदर अपघातामध्ये इंजि श्री नितीनकुमार गजानन तिवाटणे यांचे सख्खे भाऊ स्वर्गीय राकेश गजानन तिवाटणे वय वर्ष ५५ याचा मृत्यू झाला सदर ठिकाणी शासन नियमानुसार गतिरोधक असते तर त्यांचा भाउ या अपघातामधून नक्कीच वाचला असता असे त्यांना खात्रीपूर्वक वाटते.
म्हसवड नगरपरिषद हद्दीतून जाणार सातारा- पंढरपूर रस्त्यावर अपघात होऊ नयेत यासाठी इंजि नितीनकुमार गजानन तिवाटणे यांनी काही उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले असून त्यासंदर्भात त्यांनी
कार्यकारी अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ,पुणे यांना निवेदन पाठविले आहे.
सातारा- पंढरपूर रस्ता माळशिरस चौक सदर ठिकाणी तीन रस्ते आहेत याठिकाणी तिन्ही बाजूस खूप प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमणे आहेत सदर रस्त्य्वरील सर्व अतिक्रमणे मागे हटवणे आवश्यक आहे तसेच सदर ठिकाणी चौक असल्याने ROAD FURNITURE सह तिन्ही रस्त्यांचा सेंटर काढून नियमानुसार सर्कल बांधकाम करणे आवश्यक आहे आणि Speed breakers & Road safety guidelines नुसार गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले आहे.
तसेच सातारा-पंढरपूर रस्ता रामोशी वेश सदर ठिकाणी सातारा- पंढरपूर रस्ताची उंची सुमारे ०.७५ मी ने अस्तित्वातील अप्प्रोच रोड पेक्षा जास्त आहे त्यामुळे म्हसवड गावामधून सातारा- पंढरपूर रस्त्यवर प्रवेश करनाऱ्या वाहानास कसरत करावी लागत आहे शिवाय पंढरपूर कडून येणाऱ्या वाहानास म्हसवड गावामधून येणारे रस्त्याची कल्पना येत नाही तसा कोणतेही बोर्ड नाहीत त्यासाठी पंढरपूर कडून येणारे वाहनास गावामधून येणारे रस्त्यची माहिती होण्यासाठी बोर्ड बसवणे अत्यंत आवश्यक आहे तसेच म्हसवड गावामधून (रामोशी वेशीतील) अप्प्रोच रस्ता उताराचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
सातारा-पंढरपूर रस्ता चांदणी चौक- सदर ठिकाणी चौक असल्याने ROAD FURNITURE सह तिन्ही रस्त्यांचा सेंटर काढून नियमानुसार सर्कल बांधकाम करणे आवश्यक आहे आणि Speed breakers & Road safety guidelines नुसार गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे आहे
सातारा-पंढरपूर रस्ता म्हसवड बस स्थानक- सदर ठिकाणी सातारा- पंढरपूर रस्ताची उंची सुमारे १.० मी ने अस्तित्वातील अप्प्रोच रोड पेक्षा जास्त आहे त्यामुळे म्हसवड गावामधून सातारा-पंढरपूर रस्त्यवर प्रवेश करनाऱ्या वाहानास कसरत करावी लागत आहे शिवाय पंढरपूर कडून येणाऱ्या वाहानास म्हसवड गावामधून येणारे रस्त्याची कल्पना येत नाही तसा कोणतेही बोर्ड नाहीत त्यासाठी पंढरपूर कडून येणारे वाहनास गावामधून येणारे रस्त्यची माहिती होण्यासाठी बोर्ड बसवणे अत्यंत आवश्यक आहे तसेच म्हसवड गावामधून (नगरपरिषदेकडून) अप्प्रोच रस्ता उतार नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
सातारा-पंढरपूर रस्ता शिंगणापूर चौक सदर ठिकाणी चौक असल्याने ROAD FURNITURE सह तिन्ही रस्त्यांचा सेंटर काढून नियमानुसार सर्कल बांधकाम करणे आवश्यक आहे आणि Speed breakers & Road safety guidelines नुसार गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे आहे.
सातारा-पंढरपूर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामग्रह- म्हसवड न प हदीत सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामग्रहकडून येणारा रस्ता अत्यंत उताराचा आहे, सातारा पंढरपूर रस्त्यावर विश्रामग्रह कडून येणाऱ्या रस्त्य्बाबत कोणताही बोर्ड नाही तसेच Speed breakers & Road safety guidelines काहींही नाही सदर ठिकाणी Speed breakers & Road safety guidelines नुसार आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
सातारा-पंढरपूर रस्ता मायणी चौक- सदर ठिकाणी सुद्धा खूप अपघात झाले आहेत यास्तव सदर ठिकाणी चौक असल्याने ROAD FURNITURE सह तिन्ही रस्त्यांचा सेंटर काढून नियमानुसार सर्कल बांधकाम करणे आवश्यक आहे आणि Speed breakers & Road safety guidelines नुसार गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे आहे.
निवेदनाच्या शेवटी त्यांनी त्यांचा भाऊ या मध्ये मयत झाला आज तेरा दिवस झाले आम्ही कुटुंबीय काय परीस्थित आहोत हे आमचे आम्हालाच माहित माझा भाऊ गेला तशी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी म्हसवड नगर परिषद ह‌द्दीतील वरील सात ठिकाणी अपघात विरहीत प्रवास करणेसाठी जा ये करणेसाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे, यापुढे उपरोक्त ठिकाणी अपघात होऊन कोणाचा बळी न जायच्या आत सदर उपाययोजना होतील ही अपेक्षा व्यक्त केली असून या निवेदनाच्या प्रति मा पंतप्रधान,मा नितीन गडकरी,मा जिल्हाधिकारी साहेब सातारा,
मा पोलीस अधीक्षक साहेब सातारा,मा उपविभागिय आधिकारी साहेब दहिवडी,मा मुख्याधिकारी म्हसवड नगरपरिषद म्हसवड,मा सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसवड पोलीस स्टेशन यांना पाठविल्या आहेत.०००

Post Views: 6
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

सातारा – पंढरपुर महामार्गावर रंबलर उभारण्यावर सकारात्मक चर्चा, धट यांच्या प्रयत्नाला यश

Next

म्हसवड पालिकेकडुन दुषीत पाणी पुरवठा नागरीकांचे आरोग्य धोक्यात

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme