Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
प्रशासनसामाजिक

म्हसवड पालिकेकडुन दुषीत पाणी पुरवठा नागरीकांचे आरोग्य धोक्यात

By adminmandand
May 23, 2026 2 Min Read
0

म्हसवड दि. २३ ( महेश कांबळे )
म्हसवड शहरात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरु असल्याने नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी पालिकेने पाणी पुरवठा सुरु केला खरा मात्र हे पाणी अत्यंत दुषीत असल्याने नागरीकांतुन अधिकच संताप व्यक्त होवु लागला आहे, तर पालिकेकडुन टँकरद्वारे दिल्या गेलेल्या दुषीत पाण्यामुळे अनेकजणांना जुलाब, उलट्यांचा ही त्रास होत असल्याची वस्तुस्थिती आहे, यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
म्हसवड शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांना १५ दिवस वाट पहावी लागत आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक टाहो फोडत आहे, नागरीकांचे पाण्यासाठी होणारे हाल कमी करण्यासाठी गत अठवड्यापासुन म्हसवड पालिकेने टँकरद्वारे नागरीकांना पाण्याचे वाटप केले, मात्र सदरचे पाणी हे अत्यंत खराब असल्याने नागरीकांना त्याचा त्रास होत आहे, अनेकांना या पाण्यामुळे उलट्या व जुलाब सुरु आहेत. परिसरात कोठेच फारसे पाणी उपलब्ध नसल्याने अनेकांनी या टँकरकडेच धाव घेतली तर टँकर पाणी विकत घेणे हे सर्वसामान्यांना परवडत नसल्याने अनेकांनी पालिकेच्या टँकरद्वारेच आपली तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हसवड शहरासाठी अस्तिवात असलेल्या जिवन प्राधिकरण ची योजना कालबाह्य झाल्याने म्हसवडकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होवु नयेत यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केंद्र शासनाच्या २.० अंतर्गत सदरच्या योजनेसाठी सुमारे ८० कोटींचा निधी गत दोन वर्षापुर्वीच पालिकेला उपलब्ध करुन दिला आहे, त्यामुळेच नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत म्हसवडकर जनतेने मंत्री गोरे यांच्यावर विश्वास ठेवुन त्यांना पालिकेची संपूर्ण सत्ता एकहाती दिली आहे. मंत्री गोरे यांनी ही पालिका निवडणुकीत म्हसवडकरांना पिण्याचे पाणी २४/७ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते, मंत्री गोरे यांचे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांचे पालिकेतील शिलेदार धावाधाव करीत आहेत मात्र पालिकेच्या पाणी योजनेला दृष्ट लागावी त्याप्रमाणे सदरच्या योजनेला गळती लागली आहे, कधी पाईप फुटत आहेत तर कधी पाईपलाईनला गळती लागत आहे, त्यामुळे शहराला होणार्या पाणी पुरवठ्यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे, शहराला ८/१० दिवसांतुन येणारे पिण्याचे पाणी १५/१६ दिवसांवर गेल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी ओरड सुरु आहे, नागरीकांचा पाण्यासाठी रोष वाढु लागल्याने पालिकेच्या शिलेदारांनी मंत्री गोरे यांच्या आदेशानुसार रात्रंदिवस मेहनत घेवुन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला खरा मात्र सदर योजनेवरुन सोडलेले पाणी हे अत्यंत दुषीत असल्याने नागरीकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे.
अगोदरच १५ दिवसांतुन पिण्याचे पाणी नळाला आल्याने नागरीकांनी ते पाणी भरले, पालिकेनेही रात्रीच हे पाणी सोडल्याने नागरीकांनी ते अगोदर भरुन घेण्याची गडबड केली, मात्र सकाळी ज्या भांड्यात हे पाणी भरुन ठेवले होते त्या भांड्याच्या तळात माती आढळुन आल्याने नागरीकांनी तीव्र शाब्दात पालिकेच्या विरुध्द आपली नाराजी व्यक्त केली. पालिकेकडुन सोडण्यात आलेल्या पाण्याला उग्र असा वास येत असुन ते पाणीही गडुळ व मातीमिश्रीत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे, अगोदरच टँकरचे दुषीत पाणी पिवुन अनेकजण रुग्ण बनले आहेत, त्यातच आता हे दुषीत पाणी पालिकेने नळाद्वारे दिल्याने नागरीकांच्या संतापात अधिकच भर पडली आह. अनेकजण अक्षरशा पालिकेला लाखोली वाहत असुन पालिकेने या पाण्याबरोबरच नागरीकांना घरटी तुरटीचेही वाटप करावे असे ही उपरोधाने सामान्य जनता बोलत आहे. तर पालिकेने सदरच्या पाण्याबद्दल अगोदर नागरीकांमध्ये जनजागृती करायला हवी होती असे ही काही नागरीकांचे म्हणणे असुन पालिकेने पाण्याच्या नावाखाली नागरीकांच्या आरोग्याचा खेळ सुरु केला असल्याचा आरोप सर्वसामान्य म्हसवडकर करीत आहेत.

https://mandand.online/wp-content/uploads/2026/05/VID_20260523_101432970.mp4
https://mandand.online/wp-content/uploads/2026/05/VID_20260523_101930470.mp4
Post Views: 9
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड पालिका हद्दीतील सातारा – पंढरपुर रस्त्यावर गतिरोधक उभारावेत – इंजि. तिवाटणे

Next

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme