Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
Uncategorized

By adminmandand
May 24, 2026 2 Min Read
0

सातारा – पंढरपुर महामार्गावर रंबलर उभारण्यावर सकारात्मक चर्चा, धट यांच्या प्रयत्नाला यश |
म्हसवड दि. २२
सातारा ते पंढरपुर या महामार्गावर म्हसवड पालिका हद्दीत अनेक अपघात होवुन आजवर ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत, यापुढे अपघाताला आळा बसावा याकरीता पालिका हद्दीत रस्ते विकास महामंडळाने रंबलर उभारावेत अशी मागणी म्हसवड चे नगरसेवक विजय धट यांनी रस्ते विकास महामंडळाच्या विभागीय कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके व दिपाली पोतदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेवक धट हे पालिका हद्दीत रंबलर बसवण्यासाठी फार आक्रमक झाले असुन त्यांनी यासाठी शिष्टमंडळ तयार करुन थेट रस्ते विकास महामंडळाचे विभागीय कार्यालयच गाठले, या विभागाच्या प्रमुख घोडके व पोतदार यांना पालिका हद्दीत अपघाताने किती जणांचा जीव गेला आहे तर किती जण जखमी झाल्याचा पाढा वाचत याठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार शहराला जोडणार्या रस्त्यांवर रंबलर उभारावेत अशी मागणी केली आहे. यावेळी धट यांनी येथील मायणी चौक, शिंगणापुर चौक, एस.टी. बसस्थानक चौक, चांदणी चौक, सरकारी दवाखाना चौक, माळशिरस चौक मेरी माता विद्यालय, शिक्षक कॉलनी, रथ मार्ग बायपास रोड आदी ठिकाणी रंबलर उभारावेत व या ठिकाणी स्पिड लिमीटचे दिशादर्शक फलक उभारावेत अशी मागणी केली आहे. या मागणीला घोडके व पोतदार या दोन्ही अधिकार्यांनी सकारात्मकता दर्शिवत पालिकेने सहकार्य करण्याची अपेक्षा केली आहे, त्या धट व त्यांच्या शिष्टमंडळाने यासाठी पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सदर कामी लागेल ती मदत देण्याचे पालिकेला आदेश दिले असुन रस्ते विकास महामंडळाने त्वरित याठिकाणी भेट देवुन कामाला सुरुवात करावी असे संबंधित अधिकार्यांना ही सुचना दिल्या आहेत, त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा नगरसेवक धट यांनी व्यक्त केली आहे, या शिष्टमंडळात जयंत ढाले, महेश गायकवाड, निशांत पिसे पालिका अभियंता चैतन्य देशमाने आदींचा समावेश होता. यावेळी संबंधित अधिकार्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याने व मंत्री गोरे यांच्या पाठींब्यामुळे हे काम लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post Views: 5
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड पालिकेकडुन दुषीत पाणी पुरवठा नागरीकांचे आरोग्य धोक्यात

Next

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme