सैराट दुचाकी स्वारांना पोमण साहेबांनी लावला चाप!
म्हसवड दि.१८
माण तालुक्यातील म्हसवड हे महत्वाचे शहर असून शहरात काही दुचाकी स्वार सुसाट व सैराट झाले आहेत,साहेब यांना जरा चाप लावाच अशी मागणी म्हसवड शहरातील नागरिकांची मागणी होती त्याचं पार्श्वभूमीवर म्हसवडचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक संदिप पोमन यांनी कारवाईचा बडगा उगरला असून म्हसवडच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शहरात काही दुचाकी स्वार सैराट झाले आहेत,शहरातील चांदणी चौक,महात्मा फुले चौक,स्टॅन्ड परिसर व शिंगणापूर चौक याठिकाणी सैराट गाड्या पळवून काही जण अपघातास कारणीभूत ठरत आहेत.त्यांच्यावर काही कारवाई होतं नसल्याने दुचाकीच्या वेगावर नियंत्रण राहिले नसून छोटे मोठे अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागतं आहे.
शिंगणापूर चौका पासून,चांदणी चौक व नगरपालिका रोड वरून गर्दीच्या रस्त्यावर या दुचाकी वेगाने,सुसाट पळवणारे झिगाठ तरुण आहेत त्यांना कुणाचाच दबाव राहिला नसल्याने ते सैराट झाले होते.
त्यात भरीत भर म्हणून अनेक अल्पवायीन मुले व मुली सुद्धा दुचाकी शहरात सुसाट पाळविताना दिसतं होती.त्यामुळे बेजबाबदार वृत्ती मध्ये वाढ झाली आहे.अल्पवयीन मुलांना गाडी देऊ नका,अपघात झाल्यास आई वडिलांच्या वर कारवाई केली जाईल असा इशारा सरकारने दिला आहे.मात्र अल्पवायीन मुले गाडी चालवीण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
म्हसवड शहरात यापूर्वी अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत.तरी या सर्व परिस्थिती वर नियंत्रण आणण्यासाठी पोमण साहेब यांनी अशा लोकांना जरा चाप लावाच अशी मागणी म्हसवडच्या नागरिकांची होती,त्याचं पार्श्वभूमीवर म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांनी
म्हसवड शहरातील अनेक सैराट तरुणांनी दुचाकीच्या सायलेंशर मधील पुंगळ्या काढून टाकून सगळ्या पेठेतून कर्कश आवाज करीत तर.गर्दीत गाड्याची रेस वाढवून आम्हीच म्हसवडचे डॉन आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करणारांच्या वर कारवाई केली आहे.त्यामुळे म्हसवडचे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

चौकट :-पोमण साहेब तुम्ही सैराट दुचाकी स्वरांच्या वर कारवाई केलीच आहे आता अल्पवयीन दुचाकी व चारचाकी गाड्या चालवीणाऱ्या वर कारवाई करा,अशी मागणी होतं आहे.
