माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
म्हसवड दि. २५
म्हसवड पालिका हद्दीतील माळशिरस चौक ते बेघर वसाहतीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दैयनिय झाली असुन याठिकाणी दलित समाज रहात असल्यानेच या रस्त्याचे काम प्रशासनाने रखडवले आहे काय ? असा संतप्त सवाल येथील रहिवाशांकडुन उपस्थित केला जात आहे.
म्हसवड पालिका हद्दीतील या रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर बनल्याने या रस्त्यावरुन ये – जा करताना वाहनचालकांना अक्षरशा तारेवरची कसरत करावी लागत आहे, या रस्त्यावर खड्डयांची संख्या लक्षणीय असल्याने कोणचा खड्डा चुकवु अशी अवस्था वाहन चालकांची होत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात छोटे – मोठे अपघातही येथे अनेकदा झाल्याचे येथील रहिवाशी सांगत असुन या ठिकाणी खरेतर दलित समाज मोठ्या प्रमाणावर रहात आहे, या दलित समाजाची मते सर्व नेत्यांना चालतात पण या समाजाला सुविधा द्यायला का टाळतात असा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत.

माळशिरस चौक ते बेघर वसाहतीतील अंतर्गत या रस्त्याची लांबी सुमारे ५०० मिटर एवढी असुन याच अंतरावर जवळपास ५ हजार लहान – मोठे खड्डे पडले आहेत, या रस्त्याची किमान डागडुजी तरी केली जावी अशी अपेक्षा येथील नागरीकांतुन व्यक्त होत आहे.

दरम्यान पालिका हद्दीतील सदरचा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती समोर येत असुन या विभागाने यासाठी निधि ही मंजुर केला असल्याचे समजते, मात्र मिळुनही निधी रस्ता होणार तर कधी ? असा सवाल आता येथील जनता विचारत असुन पावसाळा सुरु होण्यापुर्वी सदर रस्त्याचे काम पुर्ण करुन येथील रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
चौकट –
पथदिव्यांची अवस्था गंभीर –
माळशिरस चौक ते बेघर वसहती दरम्यान यापुर्वी म्हसवड पालिकेने सदर रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसवले होते तेव्हा येथील विद्युत झगमटाट पाहण्यासाठी शहरातील नागरिक याठिकाणी येत होते, मात्र सध्या याच पथदिव्यांची अवस्था गंभीर बनली आहे, दिवसा ही हे पथदिवे सुरु असतात, तर रात्रीच्या वेळी मात्र अनेक दिवे बंद असल्याचेही येथील नागरिक सांगत आहेत. याकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.