चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा
म्हसवड दि. २५ ( महेश कांबळे )
गत अठवड्यात म्हसवड येथील मेगासिटीच्या लगत असलेल्या वनीकरणात दोन मुक्या जर्शी खोंडाच्या बछड्यांना निर्दयीपणे चार्या, पाण्या विणा सोडुन दिलेल्या त्या दोन्ही बछड्यांचा या परिसरातील मोकाट, भटक्या कुत्र्यांनी फडशा पाडला, असतानाच आज पुन्हा याच परिसरात एका लहान जर्शी बछड्यास निर्दयीपणे असेच अज्ञाताने सोडुन दिले असुन हे बछडेही चार्या, पाण्याविणा हंबरडे फोडत आहे, यापुर्वीच्या दोन जर्शी बछड्यांचा जसा भटक्यांनी फडशा पाडला तसाच या ही बछड्याचा पाडला जावु नये अशी अपेक्षा पशुप्रेमींकडुन व्यक्त होत आहे.
माण तालुक्यातील म्हसवड येथे असलेल्या मेगासिटी लगतच्या वनीकरणात काही निर्दयी व्यक्तींनी जर्शी गायींचे एक बछडं आणुन सोडले आहे, सध्या हे खोंड चार्या व पाण्याविना तेथेच हंबरडा फोडत आहेत. याठिकाणाहुन जाणार्या रस्त्यावर येवुन ते थांबत असुन येथुन जाणार्या प्रत्येक वाहनाच्या पाठीमागे ते हंबरडा फोडत धावत आहेत, तर ये – जा करणार्या पादचार्यांच्याही ते मागे जात आहेत, जणु आम्हाला तुमच्या घरी न्या अशी ते विनवणी करीत आहेत.

सध्या बाजारपेठेत खोंडाना मागणी नसल्याने त्याची विक्री होत नाही म्हणुन पशुमालक अशा खोडांना आणुन सोडुन देत आहेत. पशुमालक त्यांना सोडुन मोकळे होत असले तरी अशा बछड्यांचे चारा, पाण्याविना होत असलेले हाल, त्यांचा यासाठी सुरु असलेला हंबरडा ऐकुन अनेकांना हळहळ वाटत आहे. सध्या ज्या परिसरात हे बछडे फिरत आहेत त्याठिकाणी भटक्या श्वानांचा मोठा वावर आहेच या शिवाय लांडगेही फिरत असल्याने ही बछडी त्यांची शिकार होण्यापुर्वीच वनविभागाने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची योग्य ती व्यवस्था करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यापुर्वी येथे सोडलेली दोन निरागस बछड्यांचा भटक्या श्वानांनी फडशा पाडला आहे, आता किमान हे तरी बछडे आता अशा भटक्यांची शिकार होवु नये अशी अपेक्षा व्यक्त होत असुन यासाठी वनविभागाने त्वरित या बछड्यास ताब्यात घेवुन त्याची व्यवस्था करावी अशी मागणी पशुप्रेमींकडुन व्यक्त होत आहे. तर यापुढे या परिसरात वनविभागाने ठिकठिकाणी सिसिटीव्ही कँमेरे ही बसवुन या परिसरात घडणार्या प्रत्येक घटनेवर बारकाईने नजर ठेवावी अशी मागणी होत आहे.

खरे तर अशी निरागस खोंड यापुर्वी अनेकदा काही निर्दयीपणे कत्तलखान्याकडे जात होती, मात्र आता गावोगावी गो रक्षक निर्माण झाल्याने या मुक्या जनावरांचे प्राण निश्चित पणे वाचत आहेत, मात्र त्यांचे चार्या व पाण्याविना हाल होत आहेत. अशा जर्शा खोंडाना बाजारपेठेत मागणी नाही त्यामुळे त्याची विक्री होत नाही मग त्यांना नुसतेच संभाळायला कोणी पशुमालक तयार होत नाही म्हणुन ते अशा मुक्या जनावरांना अशा ठिकाणी मरणयातना भोगण्यासाठी सोडुन देत आहेत.