म्हसवड दि. २४
म्हसवड पालिका निवडणुकीत अपक्ष म्हणुन रिंगणात उतरलेले अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी स्वत:च्या प्रचारासाठी अक्षरशा पायाला भिंगरी बांधली आहे, ते प्रत्येक ठिकाणी ते मतदारांशी संवाद साधताना आपण काय सामाजिक कामे केलीत हे पटवुन देत असुन निवडणुकीत त्यांनी स्वत:साठी शिट्टी हे चिन्ह मागितले आहे, त्यामुळे केवटे हे प्रतिस्पर्धी उमेदवारांची नक्की शिट्टया वाजवणार असेच प्रभाग क्र. ७ मधील मतदार म्हणत आहेत.
पालिका निवडणुकीसाठी प्रचारासाठी अक्षरशा शहरात धुरळा उडाला आहे, प्रत्येक पक्षांच्या कोपरा सभांना सुरुवात झाली आहे, भाजप व विरोधी आघाडीकडुन एकमेकांवर आरोपाच्या तोफा डागल्या जात आहेत, या गर्दीत मात्र केवटे यांनी आपला वैयक्तीक भेटींचा सपाटा लावला असुन ते मतदरांचे पाय धरुन स्वत:साठी एक मत मागत आहेत. अजिनाथ केवटे यांची शहरात एक सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असुन त्यांनी आजवर नागरीकांच्या अनेक प्रश्नांसाठी शेकडो आंदोलने केली आहेत. जेष्ठ नागरिक यांच्यासाठी ते आधारवड ठरले आहेत, केवटे हे शहरातील लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणुन सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्यासाठी निवडणुक चिन्ह हे शिट्टी मागितले असुन त्यांनी मागणी केलेले उमेदवारी चिन्ह त्यांनाच मिळणार असल्याचा विश्वास त्यांना वाटत असल्याने ते मतदारांशी संवाद साधताना शिट्टी समोरील बटन दाबण्याचे सांगत आहेत. केवटे यांनी सर्वसामान्यांची अनेक कामे केली असल्याने सामान्य मतदारांचा त्यांना प्रतिसाद देताना विजयी भवचा आशीर्वाद देत आहेत. केवटे यांना जेष्ठांचा हाच आशीर्वाद पालिका निवडणुकीत विजयश्री मिळवुन देईल असा विश्वास वाटत आहे त्यामुळेच केवटे हे प्रभाग क्र. ७ मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवांराच्या शिट्टया वाजवणार असे येथील सर्वसामान्य मतदार बोलत आहेत.
सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या अजिनाथ केवटे यांना निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणुन रिंगणात उतरण्याचा हेतु विचारला असता त्यांनी सांगितले यांनी सांगितले की मी सामान्य जनतेचे काम करतो त्यांचा प्रतिनिधी सामान्य कुटुंबातील असावा हे येथील सर्वसामान्य जनतेचे म्हणणे आहे, माझ्या समोरील उमेदवार हे धनाढ्य नक्कीच आहेत पण मी निवडणुकीत त्यांना बलाढ्य ठरणार आहे, मी अपक्ष असल्याने माझा कोणी प्रचारक नाही तर सामान्य जनता हेच माझे खरे प्रचारक आहे. सामान्य जनता हीच आपली खरी ताकत असल्याचे केवटे सांगतात.०००



