
म्हसवड दि. २५
म्हसवड पालिका निवडणुकीत अत्यंत हॉट समजल्या जाणार्या प्रभाग क्र. ४ मध्ये उमेदवारांचा होम टु होम प्रचार सुरु असुन या प्रभागातुन शरदचंद्र पवार पक्षाकडुन निवडणुक लढवत असलेले अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांच्या प्रचारासाठी शहरातील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते परेशशेठ व्होरा यांनी अक्षरशा पायाला भिंगरी बांधली असुन प्रत्येक मतदारांशी संवाद साधताना ते प्रभाग क्र. ४ मध्ये तुतारी वाजवण्याबरोबरच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भुवनेश्वरी राजेमाने यांनाही मताधिक्याने निवडुन देण्याचे आवाहन करीत आहेत.
शहरातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या परेशशेठ व्होरा यांनी आपले नेते अभयसिंह जगताप यांच्या आदेशावरुन निवडणुक प्रचारासाठी प्र. क्र.४ मध्ये शड्डु ठोकला आहे. ते या प्रभागात दोन्ही राष्ट्रवादी च्या उमेदवारांच्या साठी मतदारांनी करण्याचे आवाहन करताना यंदा प्रभागात बदल घडवा असे सांगत आहेत, तर सर्वसामान्य जनता ही आता आम्हाला बदल हवा असल्याचे बोलत आहे. प्रभाग क्र. ४ मधुन निवडणुक लढवत असलेले अर्जुन कांबळे हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने सामान्यांच्या व्यथा काय असतात, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी याबद्दल त्यांना पुरेपुर माहिती असल्यानेच सामान्य जनतेतुन त्यांच्या उमेदवारीचे स्वागत होत आहे.
ज्या प्रभागातुन अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे हे निवडणुक लढवत आहेत त्या प्रभागामध्ये शहरातील सामान्य जनता मोठ्या प्रमाणावर राहते, तेथील अनेक प्रश्न प्रलंबीत असल्याने सामान्य जनता समस्यांचा पाढाच उमेदवारांसमोर वाचत असल्याचे चित्र आहे. अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे हेच या प्रभागातील प्रश्न सोडवु शकतील असा या सामान्य जनतेला वाटत असल्यानेच ही जनता आम्ही तुमच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगत आहे.
दरम्यान कांबळे – सरतापे यांच्या प्रचारासाठी युवा नेते व्होरा यांनी केलेल्या होम – होम प्रचारात सलीम शेख, हनिफ मुल्ला, बाळु लोहार, अमोल कांबळे, सुखदेव सरतापे, आदी उपस्थित होते.०००
