म्हसवड दि. १ ( महेश कांबळे )
नुकत्याच झालेल्या म्हसवड पालिकेच्या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांचे अत्यंत विश्वासु व निकटवर्तीय म्हणुन संपूर्ण माण, खटावमध्ये सुपरिचित असलेले व्यक्तीमत्व विजय रामचंद्र धट यांनी आपल्या नेत्याच्या एका इशार्यावर अचानकपणे म्हसवड येथील प्रभाग क्र.१ मधुन उमेदवारी करीत अलौकिक असा विजय मिळवत पालिका निवडणुकीत ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे, हा विजय यासाठी ऐतिहासिक ठरलाय की हा विजय, धट यांच्यातील अष्टपैलु नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.
विजय धट हे म्हसवडमधील एक सामान्य जनतेचे विश्वासु नेतृत्व म्हणुन ओळखले जाते, आजवर या युवा नेत्याने सामान्य जनतेला केंद्रबिंदु मानुन सामाजिक कार्यक्रम राबवले आहेत, राजकारण नावासाठी पण सामाजिक काम गावासाठी हे धोरण त्यांनी आजवर राबवले असल्यानेच ते सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील अक्षरशा ताईत बनले आहेत. सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनण्याची खरी ताकत त्यांना राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्यामुळेच आपणाला मिळाली असल्याचे धट हे जारीरपणे सांगतात.
विजय धट हे खरेतर सन २००६ म्हसवड च्या राजकारणात प्रवेश केला आहे, तेव्हापासुन ते आजवर म्हसवडच्या राजकारणात पुर्णपणे अखंडीत सक्रीय आहेत, या काळात त्यांनी राजकिय अनेक चढउतार पाहिले आहेत. मात्र राजकिय अनेक चढउतार पाहताना धट यांच्यातील नेतृत्व वृध्दींगत व अधिक परिपक्व होत गेलं. विजय धट हे खरे तर सर्वसामान्य कुटुंबातील एक आहेत, त्यांनी लहानपणापासुनच मेहनतीचे अनेक धडे आपले वडील कै. रामचंद्र धट यांच्याकडुन गिरवले आहेत त्यामुळे मेहनत मग ती कोणतीही असो त्यासाठी ते कधीच मागे हटले नाहीत, त्यांच्या या स्वभावामुळे ते आजच्या घडीला शहरातील सर्वात लोकप्रिय व सर्वात मोठी युवा शक्ति पाठीशी असलेले कार्यकर्ते आहेत. विजय धट यांच्यातील नेतृत्वगुण ओळखुनच माण – खटावच्या राजकीय पटलावर एन्ट्री करणार्या मंत्री गोरे यांनी २००९ साली धट यांना आपल्या सोबत घेतले. धट यांनीही मंत्री गोरे यांच्यासाठी प्रत्येक राजकिय पटलावर निकराचा लढा दिल्यानेच आज ते मंत्री गोरे यांचे सर्वात निकटवर्ती कार्यकर्ते म्हणुन ओळखले जात आहेत.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी एकनिष्ट रहात धट यांनी आपली राजकिय वाटचाल वेगाने सुरु ठेवली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांचीही त्यांना तेवढीच मोलाची साथ मिळत असल्याने धट हे मंत्री गोरे यांचे हनुमान म्हणुन ओळखले जात आहेत. आपल्या नेत्याचा प्रत्येक शब्द म्हणजे आदेश मानुन ते काम करीत आहेत, आणी काम करताना त्यांनी कधीच कोणती राजकिय सिमा पाहिली नाही म्हणजे सामान्य जनतेचे कोणतेही काम असो धट त्यांच्यासाठी नेहमीच उभे राहिले आहेत, त्यांनी ही व्यक्ती आपल्या प्रभागातील आहे की नाही हे कधीही न पाहता त्यांचे काम मार्गी लावण्याने धट यांचे म्हसवड नगरीतील सर्वच प्रभागात चाहते निर्माण झाले आहेत. धट यांच्या याच स्वभावामुळे ते सन २०११ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्र. ७ मधुन विजय मिळवला होता, खरे तर धट यांचा मुळ प्रभाग हा ५ नंबरचा आहे, मात्र नेत्यांचा आदेश हा नेहमी प्रमाण मानलेल्या धट यांनी त्यावेळी पार्टी ची गरज म्हणुन प्रभाग क्र. ७ मधुन निवडणुक लढवत विजयश्री खेचुन आणली होती, तेव्हापासुन धट यांना संकटमोचन म्हणुन संबोधले जावु लागले त्यावेळीही मंत्री गोरे यांनी धट यांच्यावर विश्वास ठेवुन त्यांना जवळपास ११ महिन्यांसाठी पालिकेत नगराध्यक्ष पदाची संधी दिली होती, ही संधी मिळताच धट यांनी शहरातील मोडकळीस आलेली सिध्दनाथ यात्रा मोठ्या प्रमाणावर भरण्यासाठी विविध प्रयत्न करुन यात्रा मोठ्या प्रमाणावर भरवुनही दाखवली होती, तर शहरातील पाणीपुरवठ्यावर काम करुन विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे काम केले होते. त्याबरोबरच शहरांतर्गत भुयारी गटार योजनेच्या मंजुरीसाठी दिल्ली पर्यंत पाठपुरावा करुन ती योजना मंजुर केली होती, अर्थातच यासाठी मंत्री गोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभल्याचे धट नेहमीच आवर्जुन सांगत आलेत.
धट यांची कार्यपध्दती सामान्य जनतेला खुपच आवडत असल्याने धट यांचे कामच खट असल्याचे सामान्य जनता सांगते, राजकारणात सक्रिय असताना देखील धट यांनी फक्त निवडणुकीपुरतेच राजकारण केले आहे, निवडणुका संपली की सामान्य जनतेला आपले दैवत मानत सामाजिक काम करणार्या धट यांना यंदाच्या निवडणुकीत ही संकटमोचकाची भुमिका चोखपणे बजावली आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक धट यांना नेत्यांनी प्रभाग क्र. १ मधुन निवडणुक लढवण्याचा आदेश दिला, नेत्यांचा आदेश नेहमीच प्रमाण मानुन काम करणार्या धट यांनी कोणतीही तयारी नसताना केवळ आपल्या नेत्याचा शब्द मानुन निवडणुकीच्या रिंगणात उडी मारत प्रभाग क्र. १ मधुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यानंतर निवडणुकीची तयारी केली आणी ही तयारी करीत असतानाच पालिका निवडणुकीसाठी इतर प्रभागाचीही जबाबदारी स्विकारली त्यामुळे धट यांना विजय मिळवताना काहीशी दमछाक झाली ही मात्र हार मानेल तो विजय कुठला, विश्वासु सहकार्यांच्या जोरावर योग्य नियोजन करीत अक्षरशा विजयश्री यंदाही खेचुन आणलीच या बहाद्दराने त्यामुळेच धट यांचा हा विजय ऐतिहासिक मानला जातोय, दुसर्यावेळी नगरसेवक म्हणुन निवडुन येताना धट यांना या ही वेळी मुळ प्रभाग सोडुनच निवडणुकीला ऐनवेळी उभे रहावे लागले आहे. त्यामुळे नेहमीच वेगवेगळ्या प्रभागातुन निवडुण येण्याची क्षमता असलेल्या धट यांच्या या विजयामुळे त्यांच्यातील अष्टपैलु नेतृत्वाची झलक सर्वसामान्य म्हसवडकरांना अनुभवास मिळाली असल्याचे सामान्य जनताच बोलत आहे.
