म्हसवड दि. २५
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहुन प्रत्येकालाच मदतीचा हात देणार्या म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व शुभम भारत गँस एजन्सीज् चे सर्वेसर्वा इंजि. सुनील पोरे यांनी मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पैलवान चैतन्य साळुंखे व पैलवान वेदांत साळुंखे या दोन्ही बंधूंना पोरे कुटुंबीयांनी मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी मायणी येथील पोरे कुटुंबियांचे निकटवर्तीय सहकारी मच्छिंद्र साळुंखे यांचे दोन्ही चिरंजीव पैलवान चैतन्य साळुंखे व पैलवान वेदांत साळुंखे यांची निवड झाली आहे.
साळुंखे कुटुंबीयांची परिस्थिती खूपच हालाखीची असून देखील या कुटुंबाने पैलवानकीचा छंद जोपासला आहे दोन्हीही मुलं आपला छंद जोपासण्यासाठी पडेल ते काम करून कुस्तीसाठी प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत त्याचेच फळ म्हणून त्यांची मलेशिया येतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मसवड येथील सामाजिक कार्यकर्ते येथील सामाजिक कार्यकर्ते नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात व गरजवंताला मदतीचा हात देत असतात याचाच भाग म्हणून त्यांनी चैतन्य व वेदांत या दोघांना मसवड येथील शुभम भारत गॅस एजन्सी मध्ये बोलावून त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना दहा हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुपूर्त करून त्यांना या स्पर्धेत यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा नेते करण भैय्या पोरे अँड .शुभम पोरे बाळासाहेब पिसे पत्रकार पोपट बनसोडे- पाटील अक्षय देशमुख ऋषिकेश देशमुख सागर नामदेव निखिल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
