Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
राजकारण

प्रत्येक झेडपी गटाला २१ कोटींचा निधी द्यावा – महेश करचे यांचे मंत्री गोरे यांना आवाहन

By adminmandand
February 12, 2026 1 Min Read
0

 

म्हसवड दि. १२
माण-खटावचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण-खटाव तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटाला २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी कुकुडवाड गटातील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार महेश करचे यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात जाहीर केलेली निधी योजना सातारा जिल्ह्यातही राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील राजकीय आणि विकासात्मक दिशा स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रसाद ओंबासे, बाळराजे विरकर उपस्थित होते.

करचे म्हणाले की, कुकुडवाड गटाची निवडणूक जिल्ह्यात विशेष लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याची चर्चा झाली, तरीही जनतेने दिलेला निकाल आम्ही मान्य करतो. आता मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी मिळून सर्वांगीण विकासासाठी काम करणे गरजेचे आहे. निवडणुकीत विजयी झालेले अनिल देसाई आणि पराभूत झालेले अरुण गोरे यांनी विकासासाठी काम करण्याची भूमिका मांडली आहे, त्याचे स्वागत आहे. मात्र विकासाची ठोस दिशा, नियोजन आणि कालमर्यादा स्पष्ट केली पाहिजे. मी स्वतः गटातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करणार असून गरज पडल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

करचे पुढे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील प्रचारादरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटाला २१ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. तीच योजना सातारा जिल्ह्यात, विशेषतः माण-खटाव तालुक्यात राबवली पाहिजे. माण-खटाव तालुक्यात त्यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले असून ज्या ठिकाणी उमेदवार विजयी झाले नाहीत, तिथेही मोठ्या प्रमाणावर मतदान मिळाले आहे. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता सर्व जिल्हा परिषद गटांना समान निधी देऊन विकासाची प्रक्रिया गतीमान करावी, अशी आमची ठाम मागणी आहे.०००

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी श्रीदेवी पिसे यांची निवड

Next

क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे, लेखक प्रा. अजित काटकर

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme