Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
राजकारण

म्हसवड पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी श्रीदेवी पिसे यांची निवड

By adminmandand
January 16, 2026 2 Min Read
0

म्हसवड दि. १६
म्हसवड नगरपरिषदेत मुख्याधिकारी डॉ. सचिन माने व नगराध्यक्षा पुजा विरकर यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या ऩपनगराध्यक्ष पदाची निवडणुक कार्यक्रम संपन्न होवुन यासाठी भाजपच्या श्रीदेवी निशांत पिसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
म्हसवड नगरपालिकेत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांची एकहाती सत्ता असुन ही सत्ता मिळवताना ना. गोरे यांनी विरोधकांना २१/० अशी धुळ चारत पालिका ताब्यात घेतली आहे. पालिकेच्या नगराध्यक्षपदी पुजा सचिन विरकर यांची वर्णी मंत्री गोरे यांनी लावत म्हसवडकरांना निवडणुकीपुर्वी दिलेला शब्द खरा करुन दाखवला आहे. मंत्री गोरे यांचा शब्द म्हसवडकरांना एक प्रमाण ठरला असुन ते जे बोलतात ते करुन दाखवतात अशी त्यांची ख्याती असल्यानेच म्हसवडकरांनी पालिका निवडणुकीत त्यांच्या पारड्यात भरघोस मतदान टाकत पालिकेची एकहाती सत्ता ताब्यात दिली आहे.
म्हसवड पालिका सभागृहात आज उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार असल्याने शहरात यावरुन अनेक चर्चा सुरु होत्या मात्र अंतिम निर्णय मंत्री गोरे हेच घेणार असल्याने ते कोणाचे नाव घेणार याबाबत उत्सुकता होती, तर पालिकेच्या नगराध्यक्षपदी एक महिला असल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी एकादा पुरुष निवडला जाईल अशी चर्चा शहरात सुरु असताना नेहमी धक्का तंत्र देणार्या मंत्री गोरे यांनी या पदासाठी शहरातील एका सर्वसामान्य कुटुंबातील श्रीदेवी निशांत पिसे या महिलेची निवड केली. मंत्री गोरे यांच्या या निर्णयाचे सर्व पालिका सदस्यासह, प्रशासनातुन व म्हसवडकर नागरीकांतुन स्वागत करण्यात आले.
ना. जयकुमार गोरे हे दुदृष्टीचे नेते असल्यानेच त्यांनी सामान्य कुटुंबातील महिलेला या पदासाठी संधी दिली असल्याने सामान्य नागरीकांतुन मंत्री गोरे यांच्या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे.
दरम्यान पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी श्रीदेवी निशांत पिसे यांची निवड जाहीर होताच पालिकेबाहेर त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करीत जय हो चा नारा दिला. पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी श्रीदेवी पिसे यांची निवड झाल्याबद्दल मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी त्यांचे प्रशासनातर्फे अभिनंदन केले. तर पिसे यांची उपनगराध्यक्ष पदी वर्णी लागल्याने पालिकेत नगराध्यक्ष व उपनगराध्या या दोन्हीही महिलाच असल्याने शहरातील महिलांचे प्रश्न व त्यांच्या अडचणी लवकरच सुटतील अशी अपेक्षा सर्वसामान्य महिलांतुन व्यक्त होत आहे.
पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी श्रीदेवी पिसे यांची निवड जाहीर होताच येथील माळी समाजाने ज्ल्लोष करीत त्यांचे अभिनंदन केले.००

Post Views: 1
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

जय पराजय पेक्षा खेळातील सहभाग महत्त्वाचा – अमोल कांबळे

Next

प्रत्येक झेडपी गटाला २१ कोटींचा निधी द्यावा – महेश करचे यांचे मंत्री गोरे यांना आवाहन

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme