Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
शैक्षणिक

जय पराजय पेक्षा खेळातील सहभाग महत्त्वाचा – अमोल कांबळे

By adminmandand
January 16, 2026 1 Min Read
0

म्हसवड दि.१६
क्रीडा स्पर्धेमध्ये जय किंवा पराजय पेक्षा खेळातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी आपली सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा म्हसवडचे शाखाधिकारी अमोल कांबळे यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवड येथे 14, 17 व 19 शालेय टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आयोजित केल्या होत्या. कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यातील संघ यामध्ये सहभागी झाले आहेत.एसबीआय म्हसवड शाखेचे शाखाधिकारी अमोल कांबळे यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते.
यावेळी बोलताना व्यवस्थापक अमोल कांबळे म्हणाले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्हाला घडवण्यासाठी क्रीडा शिक्षक, संस्थाध्यक्ष यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य मिळत आहे. यातूनच एखादा भारतरत्न सचिन तेंडुलकर घडावा ही माझी अपेक्षा आहे.
खेळामध्ये शिस्त पाळा, खिलाडू वृत्ती दाखवा, पंचाचा निर्णय अंतिम माना. अभ्यासाबरोबरच खेळाला सुद्धा प्राधान्य देण्याचे आवाहन कांबळे यांनी केले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या उपक्रमशील ते बद्दल त्यांनी बाबर दांपत्याचे अभिनंदन केले.
यावेळी संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर यांनी मनोगत व्यक्त करून माण तालुक्याची सुकन्या, उपजिल्हाधिकारी ललिता बाबर ही ऑलम्पिक मध्ये सहभागी झाल्याचे उपस्थितांना सांगितले. प्रास्ताविक राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे सरचिटणीस क्रीडा शिक्षक चंद्रकांत तोरणे व महेश सोनवले यांनी केले. त्यानिमित्ताने दीपक काटकर , उपस्थित क्रीडा शिक्षक व खेळाडूंचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला. उपस्थितांचे आभार समन्वयक अभिजीत सावंत यांनी केले.

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड शहरात भटक्या श्वानांचा हैदोस, सामान्य नागरीकात प्रचंड दहशत

Next

म्हसवड पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी श्रीदेवी पिसे यांची निवड

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme