Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
शैक्षणिक

क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे, लेखक प्रा. अजित काटकर

By adminmandand
February 13, 2026 1 Min Read
0

म्हसवड दि. १३
म्हसवड येथील क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे या संकुलात शिकायला मिळणारे तुम्ही भाग्यवान विद्यार्थी आहात असे प्रतिपादन ग्रामीण मराठी लेखक प्रा.अजित काटकर यांनी केले. ते क्रांतिवीर शॆक्षणिक संकुलातील प.पु.आत्मगिरी विद्यालयातील इयत्ता दहावी विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी विकास प्रतिष्ठान च्या सचिव सॊ.सुलोचना बाबर होत्या यावेळी क्रांतिवीर सी बी एस सी चे प्राचार्य विन्सन जाॅन, ज्युनिअर काॅलेजचे प्राचार्य विठ्ठल लवटे, प.पु.आत्मगिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल माने उपस्थित होते.
या वेळी बोलताना अजित काटकर पुढे म्हणाले की आयुष्यात कितीही मोठे व्हा पण जन्म देणारे मातापिता पोषण करणारी माती व ज्ञानसंपन्न करणारे गुरुजन यांना कधीही विसरू नका.माण सारख्या दुष्काळी भागातील काही लोकांनी मन मनगट व मेंदूचा वापर करुन संपुर्ण भारतभर नावलॊकिक मिळवला आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अनेकजण देशसेवा करीत आहेत.
आत्मविश्वास नसणारी माणसं आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत.दहावीच्या या परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वासाने जा निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा बाबर मॅडम म्हणाल्या की या शॆक्षणिक संकुलात शिक्षण घेतलेली अनेक मुले मुली विविध क्षेत्रात काम करीत आहेत.आपणासमोर चांगल्या व्यक्तींचा आदर्श ठेवा व त्याच्या सारखे बनायचा प्रयत्न करा. कार्यक्रमात प्रा.विन्सन जाॅन, प्रा.विठ्ठल लवटे, भोसले सर यांच्यासह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमात शाळेतील विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गॊरवण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला तीन कार्यालयीन खुर्च्या भेट दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल माने यांनी केले तर शॊर्या सरतापे व अनुष शेटे यांनी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

Post Views: 1
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

प्रत्येक झेडपी गटाला २१ कोटींचा निधी द्यावा – महेश करचे यांचे मंत्री गोरे यांना आवाहन

Next

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक स्थळाची पंढरपुरात श्री.संत नामदेव महाराजांच्या वंशजाकडुन पाहणी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme