Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिकप्रशासन

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारक स्थळाची पंढरपुरात श्री.संत नामदेव महाराजांच्या वंशजाकडुन पाहणी

By adminmandand
February 14, 2026 2 Min Read
0

 

म्हसवड दि. १४

संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या स्मारक स्थळाची पाहणी संत नामदेव महाराज यांच्या वंशजाकडुन व समाजबांधवांकडुन पंढरपुर येथे जावुन करण्यात आली, यावेळी या समाज बांधवाकडुन स्थळ पाहणी करताना आनंद व्यक्त करण्यात येवुन शासनाचे आभार मानण्यात आले.
संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचे भव्य स्मारक पंढरपुर या तीर्थ क्षेत्र ठिकाणी याठिकाणी व्हावे यासाठी समस्त शिंपी समाज व संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या वंशजाकडुन शासनाकडे करण्यात आली होती, समाजाची ही मागणी नासप चे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांनी लावुन धरत यासाठी राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांना साकडे घातले होते त्यांच्या या मागणीला शासनाकडुन हिरवा कंदील दाखवण्यात येवुन त्यासाठी प्रत्यक्षात निधीही मंजुर करण्यात आल्याने समस्त शिंपी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पंढरपूर येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी शासनाने मंजूर केलेल्या जागेची गुरुवार, दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी स्थळ पाहणी करण्यासाठी अनेक समाजबांधवांनी स्मारकस्थळी हजेरी लावली होती.
या स्थळ पाहणीपूर्वी श्री. केशवराज संस्था, नामदेव मंदिर, पंढरपूर येथे सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये नामदेव महाराज यांच्या वंशजासह समाजबांधव, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर भक्ती सागर परिसरात, चंद्रभागा नदीच्या पलीकडे असलेल्या सुमारे 65 एकर क्षेत्रालगत स्मारकासाठी प्रस्तावित जागेची अधिकृत पाहणी करण्यात आली.
या पाहणीसाठी उपविभागीय अधिकारी पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रकल्प सल्लागार उपस्थित होते.
श्री संत नामदेव महाराज यांच्या स्मारक उभारणीसाठी आराखडा व नियोजन प्रक्रिया वेग घेणार असून, ही पाहणी समाजासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षण ठरली.
या वेळी नामदेव महाराज वंशज,नामदेव समाजोन्नती परिषद,श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ,श्री केशवराज संस्था पंढरपूर व श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
स्थळ पाहणीनंतर सर्व उपस्थितांसाठी नामदेव मंदिर येथे भोजन व्यवस्था करण्यात आली.
श्री संत नामदेव महाराज स्मारक उभारणीसाठी सुरू झालेली ही प्रक्रिया समाजाच्या ऐक्याचे व श्रद्धेचे प्रतीक ठरत आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.०००

Post Views: 1
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

क्रांतिवीर शॆक्षणिक संकुल हे ज्ञान व संस्काराचे मंदिर आहे, लेखक प्रा. अजित काटकर

Next

पैसे द्या आणी बांधकाम कामगार व्हा, ग्रामीण महिलेचा अनोखा फंडा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme