Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
शैक्षणिक

ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा- लुनेश विरकर वळई हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

By adminmandand
February 18, 2026 1 Min Read
0

 

म्हसवड दि. १८

जीवनात येणाऱ्या अपयशाने खचून न जाता ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे असल्याचे मत अहिल्या शिक्षण संस्थेचे संचालक लुनेश विरकर यांनी व्यक्त केले.
ते वळई ता.माण येथील सर्वलिंग विद्यालयात आयोजित केलेल्या इयत्ता दहावीच्या शुभचिंतन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी
सरपंच बबन दादा काळेल, प्रमुख पाहुणे आदर्श विद्यालय बनगरवाडीचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तोरणे, संस्थेचे संचालक यु.सी.नलवडे, पोलीस पाटील दादासो आटपाडकर,मुख्याध्यापक संजय ढवळे, एस.पी.शेंडगे,उत्तरेश्वर खोत, श्रीमती. जे.एल सरगर,सौ.रूक्मिणी नलवडे, सौ.कंदा काळेल, लिपिक सोमनाथ काळेल, जयश्री काशीद, नंदकुमार काळेल आदीसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना लुनेश विरकर म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी गती पेक्षा दिशा अधिक महत्त्वाची असते हे आपण लक्षात ठेवून मार्गक्रमण करणे गरजेचे असल्याचे आवर्जून सांगितले.नम्रता, प्रामाणिकपणा, ध्येय प्राप्तीसाठी सर्वोच्च देण्याची मानसिकता हे गुण प्रत्येक विद्यार्थ्यांकडे असणे काळाची गरज बनल्याचे स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुख्याध्यापक सिध्दार्थ तोरणे म्हणाले की ,स्वतः शी प्रामाणिक रहा, स्वतः वर प्रेम करा, आत्मचिंतन करा, दुर्गण बाजूला करून जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःशीच प्रमाणिक राहिल्यास यश हमखास मिळेल असा विश्वास व्यक्त केला.सरपंच बबन दादा काळेल यांनी ही विद्यार्थ्यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान संचालक यु.सी.नलवडे यांनी आपल्या मनोगतातून तर यश प्राप्तीसाठी जिद्द चिकाटी व प्रामाणिकपणा अत्यंत आवश्यक असल्याचे आवर्जून सांगितले.सौ.कुंदा काळेल व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय ढवळे यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती जे.एल.सरगर यांनी केले तर सौ.रुक्मिणी नलवडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व स्टाफनी परिश्रम घेतले.०००

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

पैसे द्या आणी बांधकाम कामगार व्हा, ग्रामीण महिलेचा अनोखा फंडा

Next

म्हसवड शहरात गुडी पाडव्याचे साखरगाठी बनवण्याची लगबग |

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme