Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
महाराष्ट्र

म्हसवड शहरात गुडी पाडव्याचे साखरगाठी बनवण्याची लगबग |

By adminmandand
March 5, 2026 1 Min Read
0

म्हसवड दि. ५
साडेतीन मुहुर्तापैकी एक समजल्या जाणार्या गुढीपाडव्याच्या सण अवघ्या काही दिवसांवर येवुन ठेपला असल्याने या सणानिमीत्त लागणार्या साखरेचे हार ( गाठी ) बनवण्याच्या कामाला म्हसवड शहरात चांगलीच गती आली आहे.
म्हसवड शहरात कांबळे बंधु यांचे साखरेचे हार सर्वदुर प्रसिद्ध असुन पाढव्यानिमीत्त लागणार्या या साखरेच्या हारा ला सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापुर व पुणे जिल्ह्यातही मोठी मागणी आहे. पांढरे, व रंगीबेरंगी साखरेचे आकर्षक हार बनवण्याची सध्या लगबग सुरु आहे. पाढव्याच्या १ महिना अगोदर हे हार बनवण्यास सुरुवात होते, यासाठी नगर येथील कुशल कारागिर म्हसवड येथे १ महिन्यासाठी मुक्कामी राहुन हार बनवण्याचे काम करीत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडवा या सणाला फार महत्व असुन या सणानिमीत्त प्रत्येक हिंदु नागरीक हा आपल्या घरावर गुढी उभारत असतो, तर गुढी ही मांगल्याचे प्रतिक मानले जाते या गुढीला साखरेचा हार घालण्याची मोठी परंपरा आहे. गुढीपाडव्यापासुन नवीन मराठी वर्षाला सुरुवात होत असुन वर्षातील पहिलाच मोठा सण म्हणुनही या सणाची विशेष ओळख आहे, तर प्रत्येक मराठी माणुस हा आपला कोणताही नवीन व्यवसाय अथवा शुभ कार्याची सुरुवात याच सणापासुन सुरु करण्याचा प्रयत्न करीत असल्याने या सणाचे महत्व महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.

Post Views: 3
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा- लुनेश विरकर वळई हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

Next

अल्पवयीन मुलाची धिंड काढणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा अन्यथा धरणे आंदोलन – भागवत जानकर व महेश करचे यांचा इशारा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme