Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

अल्पवयीन मुलाची धिंड काढणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा अन्यथा धरणे आंदोलन – भागवत जानकर व महेश करचे यांचा इशारा

By adminmandand
March 7, 2026 1 Min Read
0

 

म्हसवड दि. ७
म्हसवड येथे खोटा व बनावट गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलासह काही युवकांची सार्वजनिकरित्या धिंड काढल्याच्या गंभीर प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अप्पर तहसीलदार कार्यालय, म्हसवड समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भागवत अर्जुन जानकर व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी दिली.
सदर प्रकरणात तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करून काही युवकांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात बनावट गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये अल्पवयीन मुलाचीही सार्वजनिकरित्या धिंड काढून बदनामी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना मानवी हक्कांचे तसेच बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियमाचे उघड उल्लंघन असल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भात अल्पवयीन मुलाच्या पालकांनी मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रार दिली असतानाही आजपर्यंत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असून आरोपी पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“अल्पवयीन मुलाची धिंड काढणे, त्याची ओळख जाहीर करणे आणि सार्वजनिकरित्या बदनामी करणे हा अत्यंत गंभीर व बेकायदेशीर प्रकार आहे. तरीही संबंधितांवर गुन्हा दाखल होत नसल्याने न्याय मिळवण्यासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे,” असे भागवत जानकर व महेश करचे यांनी म्हटले आहे.
सदर आंदोलन पूर्णतः शांततामय व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून शासन व प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.०००

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड शहरात गुडी पाडव्याचे साखरगाठी बनवण्याची लगबग |

Next

विद्यार्थीनीला मारहाण, पालक, शिक्षिकेत जुंपली, वाद पोलीस स्टेशन च्या दारात |

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme