Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
शैक्षणिक

विद्यार्थीनीला मारहाण, पालक, शिक्षिकेत जुंपली, वाद पोलीस स्टेशन च्या दारात |

By adminmandand
March 7, 2026 3 Min Read
0

 

म्हसवड दि. ८
म्हसवड पालिका हद्दीत असलेल्या विरकरवाडी येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेत विद्यार्थिनीला शाळेतील महिला शिक्षिकेने मारहाण करुन जखमी केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी करीत संबंधित शिक्षिकेच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली तर संबंधित शिक्षिकेनेही शाळेतील सर्व विद्यार्थी एकत्र करीत संबंधित पालकांनीच आपल्याला दमदाटी करुन मारहण केल्याचा आरोप करीत सर्व विद्यार्थ्यांसमावेत पोलीस स्टेशन गाठले, पाठोपाठच शिक्षक व इतर पालकांनीही म्हसवड पोलीस स्टेशन गाठल्याने पोलीस स्टेशनआवारातच विद्यार्थ्यांची शाळा भरल्याचे चित्र दिसुन आले.
याबाबत समजलेली अधिक माहिती पुढीलप्रमाणे विरकरवाडी येथील शाळेत विद्यार्थिंनीना सोबत घेवुन एक शिक्षिका शाळेची स्वच्छता करीत होत्या त्यावेळी दोन्ही विद्यार्थिनींची तक्रार झाली ती तक्रार ऐकुन संबधित दोन्ही विद्यार्थिनींना शिक्षिकेने बोलावले असता त्यातील एक विद्यार्थिनी ही शाळेच्या ड्रेस वर न येता वेगळ्याच ड्रेसवर आल्याने संबंधित शिक्षिकेने याबाबत तिच्याकडे विचारणा करीत तिला शिक्षा म्हणुन हातावर काठीने मारले, असे संबंधित शिक्षिकेचे म्हणणे आहे.
तर आपणाला शिक्षिकेने यापुर्वीही दोन चार वेळा मारहाण केली असुन आज केलेल्या मारहाणीतुन आपल्या हाताच्या बोटातुन रक्त येवु लागल्याने मी संबंधित शिक्षिकेने आपल्याला केलेली मारहाण शाळेच्या प्राचार्यांना सांगितली असुन त्यानंतर प्राचार्यांनी मला घरी जायला सांगितल्यावर मी घरी जात असताना माझी आजी रस्त्यात भेटली तिने माझ्या हातातुन येत असलेले रक्त पाहुन तडक शाळा गाठली व संबंधित शिक्षिकेला त्याठिकाणी जाब विचारला असता, संबंधित शिक्षिकाच माझ्या आजीच्या अंगावर धावुन गेली असल्याचे विद्यार्थिनीचे मत आहे.
ही घटना जेव्हा संबंधित विद्यार्थिनीच्या वडिलांना समजली तेव्हा त्यांनीही शाळेत धाव घेत याबाबत शाळेल प्रशासनाला जाब विचारला त्यावेळी संबंधित शिक्षिकेने आपल्याला ही उलट, सुलट उत्तरे दिल्याचा आरोप संबंधित मुलीच्या पालकांनी केला असुन त्यांनी याप्रकारानंतर मुलीला घेवुन तडक पोलीस स्टेशन गाठल्याने संबंधित शिक्षिकेने ने आपल्या बचावासाठी संपूर्ण वर्गच सोबत घेत पोलीस स्टेशन गाठल्याने पोलीस स्टेशन मध्ये एकच गोंधळ उडाला ही बाब जेव्हा विरकरवाडीतील ग्रामस्थांना समजल्याने अनेक ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन कडे धाव घेतली, तर अनेक पालक हे पोलीस स्टेशन ला गेल्याची माहिती समजताच शाळेतील प्राचार्य व शिक्षक ही पोलीस स्टेशन ला आल्याने त्याठिकाणी पालक, विद्यार्थी व शिक्षक अशी एकच गर्दी दिसुन आल्याने पोलीस स्टेशन मध्ये च विद्यार्थ्यांची शाळा भरल्याचे चित्र दिसुन आले.
दरम्यान यावेळी अनेक शिक्षकांनी संबंधित शिक्षिकेला समजुन सांगण्याचा प्रयत्न केला, तर अनेक पालकांनी पोलीस स्टेशन ला तुम्ही विद्यार्थी का घेवुन आला याचाही जाब विचारला, तर संबंधित मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीला यापुर्वीही संबंधित शिक्षिकेने मारहान केली होती मात्र आज ची मारहाण आपणाला सहन झाली नाही त्यामुळे सदर शिक्षिकेच्या विरोधात आपण पोलीस स्टेशन ला धाव घेतली असल्याचे सांगितले.

चौकट –
पालक – शिक्षिकेची पोलीसांसमोरच तु तु मै मै –
शाळेतील हा वाद पोलीस स्टेशन ला गेल्यावर पोलीस स्टेशन च्या आवारात सर्व शालेय विद्यार्थी जमा झाल्याने पोलीस स्टेशन चे कर्मचारी बाहेर आल्यावर त्यांनी काय झाले आहे असे विचारताच संबंधित शिक्षिका व पालक यांच्यात वाद सुरु झाला त्यावेळी काही पालक ही यात सहभागी झाल्याने पोलीसांसमोरच या सर्वांची तु तु मै मै सुरु झाल्याने अखेर पोलीसांनी आवारात गोंधळ घालु नका, तक्रार द्यायची असेल तर द्या अन्यथा घरी जावा अशी सर्वांनाच तंबी दिली.

प्रतिक्रिया –
सदर शिक्षिकेची बदली करावी – माजी नगरसेवक दिपक बनगर –
शाळेत घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे, शाळेतील प्रकाराबाबत संबंधित शिक्षिकेने प्राचार्यांना सांगायला हवे होते, मात्र वर्गातील सर्व विद्यार्थी घेवुन तडक पोलीस स्टेशन ला जायला नको होते, हा प्रकार शाळेच्या इतिहासात प्रथमच घडला आहे, हा प्रकार आमच्या वाडीचे नाव खराब करणारा असुन सदर प्रकाराबाबत आपण संबंधित शिक्षिकेच्या बदली ची मागणी शालेय प्रशासनाकडे करणार असल्याचे माजी नगरसेवक दिपक बनगर यांनी सांगितले.००

Post Views: 3
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

अल्पवयीन मुलाची धिंड काढणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा अन्यथा धरणे आंदोलन – भागवत जानकर व महेश करचे यांचा इशारा

Next

क्रांतिवीर संकुलात नारी शक्तीचा एल्गार

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme