म्हसवड दि. १०
सहकार क्षेत्रासह सामान्य क्षेत्रात अग्रस्थानी राहुन सर्वसामान्य ग्राहकांचे हित जोपासणार्या म्हसवड शहराचे वैभव ठरलेल्या अंहिसा पतसंस्थेने सुरु केलेली अनोखी चांदी तारण योजना सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरणार असल्याने या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन म्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षा पुजा विरकर यांनी केले.
अहिंसा पतसंस्थेमध्ये चांदी तारण कर्ज योजनेचा फीत कापून म्हसवड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई विरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यकर्मात त्या बोलत होत्या, यावेळी नगरसेवक विकास गोंजारी, साहित्यिक अजित काटकर,भाजपा नेते सचिन विरकर, संचालक अभिराज गांधी आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पूजा विरकर यांची नगराध्यक्ष पदी निवड झाले बद्दल अहिंसा परिवाराच्या वतीने यावेळी संत बाळूमामा यांची प्रतिमा व शाल देऊन सत्कार माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन भाई दोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक विकास गोंजारी म्हणाले अहिंसा पतसंस्थेने चांदी तारण कर्ज योजना माण तालुक्यात प्रथम सुरू केली आहे अहिंसा पतसंस्थेचा ग्राहक उपयोगी नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्याचा प्रयत्न असतो.
लेखक अजित काटकर म्हणाले चांदी तारण कर्ज योजना सभासदांच्या हिताची ठरेल कारण सोने-चांदी तारण कर्ज हे तात्काळ देण्याची व्यवस्था केली आहे. अहिंसा पतसंस्थेच्या कामकाजामुळे समाजात वेगळे स्थान निर्माण झाले आहे.
अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन् नितिन दोशी म्हणाले या चांदी तारण कर्ज योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा कमी कागदपत्रे व तात्काळ कर्ज त्यामुळे या कर्जास लोकांचा प्रतिसाद चांगला मिळणार आहे पुढे नितिन दोशी म्हणाले नगराध्यक्ष सौ. पूजाताई विरकर यांनी मा. ना. जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली म्हसवडचा चौफेर विकास करावा माननीय नामदार जया भाऊ हे म्हसवड नगर पालिकेला निधीची कमतरता कधीच भासू देणार नाहीत फक्त तुम्ही सतर्क राहून विविध विकास कामे मार्गी लावावीत. नागरिकांच्या साठी स्वच्छता पाणी व आरोग्य यासंबंधी प्राधान्याने काम व्हावे. जेणेकरून म्हसवडच्या नागरिकांना दिलासा मिळेल.
यावेळी नगराध्यक्षा सौ. पुजाताई विरकर यांनी पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक करत चांदी तारण कर्ज योजनेचा शुभारंभ केल्याचे जाहीर केले.
सूत्रसंचालन अक्षय धट यांनी केले व आभार बाबू मुल्ला यांनी मानले.
