म्हसवड दि. २५
म्हसवड पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग ६ मधुन भाजपकडुन आखाड्यात उतरलेल्या आकाश बाळासाहेब पानसांडे या युवा उमेदवारासाठी प्रभागातील तरुणाई व महिला वर्ग रस्त्यावर उतरल्याचे चित्र असुन मतदारांकडुन त्यांना मिळणारा प्रतिसाद आकाश निवडणुकीत आकाश भरारी घेईल असे चित्र त्यांच्या प्रचाराला मिळणार्या मतदारांच्या प्रतिसादावरुन दिसत आहे.
आकाश पानसांडे हा नव तरुण युवक सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला असुन भाजपने त्यांना प्र. ६ मधुन नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग ६ मध्ये भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गट असा सामना होत आहे, या प्रभागात अनेक समस्या असल्याचे नागरिक त्यांना प्रचार दौर्यात सांगत असुन या प्रभागातील सर्व समस्या आपण ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातुन नक्की सोडवु असा विश्वास ते मतदाराला देत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी प्रभागातील सर्व प्रमुख व्यक्ती ह्या आपल्या कुटुंबासोबत घरोघरी फिरत असुन आकाश ला निवडुण देण्याचे आवाहन करीत आहेत.
आकाश पानसांडे यांच्या प्रचारासाठी ज्या महिला फिरत आहेत, त्यांच्या मते आकाशच असा आहे की ज्याला आमच्या समस्या काय आहेत, येथील ररिवाशांचे प्रश्न काय आहेत याची त्याला सर्व माहिती असुन तोच आमचे प्रश्न सोडवु शकतो, तर येथील प्रभागात आकाश च्या माध्यमातुन महिलावर्गासाठी एखादी महिला उद्योग सुरु होवुन महिलांच्या हाती काहीतरी काम मिळेल असा विश्वास त्या व्यक्त करीत आहेत. या प्रभागात रस्त्यांचा मोठा प्रश्न असुन याकडे आजवरच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असल्यानेच तो प्रश्न आता गंभीर बनल्याचे येथील मतदार सांगत आहेत हा प्रश्न आता आम्हालाच सोडवावा लागणार असल्यानेच आम्ही आमचा प्रतिनिधी म्हणुन आकाश यालाच पालिकेत पाठवणार असल्याचे येथील महिला मतदार सांगत आहेत.०००
