म्हसवड दि.२४
म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणुन निवडणुक लढवत असलेले प्रा. विश्वंभर बाबर यांनी मतदारांशी थेट भेटी – गाठी देण्यावर भर दिला आहे, तर राज्याचे उप मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातुन शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम आपण करणार असल्याचे ते मतदारांशी संवाद साधताना बोलत आहेत.
म्हसवड पालिका निवडणुकीत प्रचाराचा अक्षरशा धुराळा उडाल्याचे चित्र आहे, शहरासह वाड्या वस्त्यांवर प्रचाराला उत आला आहे, शहरात सध्या भाजप व सिध्दनाथ नागरिक आघाडीमध्ये तुल्यबळ लढत होत असुन दोन्हींकडुन हायटेक प्रचार व प्रचार यंत्रणा राबवली जात आहे, मात्र या सर्वात हटके प्रचार सुरु आहे तो प्रभाग क्र. ७ ( ब ) मधुन शिवसेनचा धनुष्यबाण हाती घेवुन निवडणुकीच्या आघाड्यात उतरलेल्य् प्रा. विश्वंभर बाबर यांचा, धन्यष्य बाणाने जसे एकावेळी एकाची शिकार केली जाते अगदी त्याचप्रमाणे प्रा. बाबर यांनी एक – एक उमेदवारांशी थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. प्रा. बाबर हे एकमेव शिवसेनेचे अधिकृत उमेदवार येथे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांचे विशेष लक्ष बाबर यांच्याकडे आहे. प्रा. बाबर हे गत २५ वर्षापासुन सामाजिक कार्यात अग्रेसर असुन उच्च विद्याविभुषित असे उमेदवार आहेत. ते ज्या प्रभागातुन निवडणुक लढवत आहेत त्या प्रभागातील रस्ते, पाणी यासाठी वांरवार शासन दरबारी आवाज उठवला आहे. त्यांना पाणी संघर्ष परिषदेच्या सामाजिक चळवळीचा दांडगा अनुभव असल्याने कोणते विकास काम कोणाकडुन कसे करायचे याची चांगलीच माहिती आहे. प्रा. बाबर यांनी म्हसवडच्या ओसाड माळरानावर २२ वर्षापुर्वी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे आज एक विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे. येथील हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची कवाडे प्रा. बाबर यांनी सुरु केलेली आहेत.
प्रा. बाबर यांनी आजवर आपण केलेली लोकोपयोगी कामेच ते मतदरांसमोर ठेवत आहेत, आजवर त्यांनी कोणीही आल्यावर त्याच्या कामाला नाही म्हटलेलं नसल्याने सामान्य जनतेला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास वाटत आहे. प्रा. बाबर यांनी आजवर जी लोकहितासाठी लढा उभारला आहे तो लढाच त्यांचे राजकिय भांडवल असुन सामान्य जनतेला ते आपल्या घरातील एक सदस्य वाटत असल्याने सर्वसामान्य मतदार त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करीत असल्याचे चित्र सध्या प्रभाग क्र. ७ मध्ये दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या प्रा. बाबर यांच्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी ताकत उभी करण्याचा शब्द दिला असुन त्यांच्या नेतृत्वाखालीच आपण निवडणुकीचे शिवधनुष्य हाती घेतल्याचे प्रा. बाबर यांनी यावेळी स्पष्ट केले. तर प्रा. बाबर यांच्या उमेदवारीमुळे सर्वसामान्य जनताही सुखावली असल्याचे चित्र सध्या प्रभाग क्र. ७ मध्ये दि सत आहे.

