म्हसवड दि. २३
म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीची शहरात रणधुमाळी सुरु आहे, प्रत्येक उमेदवार हा थेट मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र या सर्व उमेदवारांमध्ये पालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसुन येते.
भारतीय जनता पक्षाकडुन निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले धट हे मतदारांशी थेट संवाद साधत असुन प्रत्येक मतदारांना भेटुन ते त्यांच्या अडी – अडचणी समजुन घेत आहेत. धट यांचे काम यापुर्वी येथील जनतेने पाहिले असल्याने सामान्य मतदार ही धट यांच्यावर विश्वास असल्याचे सांगत असुन धट यांचे कामच खट असल्याचे सामान्य जनता सांगत आहे. धट हे प्रभाग क्र. १ मधुन उमेदवारी करीत असुन त्या प्रभागात कक्कया समाजाची खुप घरे आहेत, त्या प्रत्येकाच्या घरी जावुन त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणुन घेत त्या अडचणींची नोंद आपल्या डायरीत करुन घेतली.
सन २०१/१२ साली पालिकेत ना. गोरे यांची पालिकेत सत्ता होती त्याकाळात विजय धट यांना जवळपास ११ महिने पालिकेच्या नगराध्यक्ष पदाची संधी मंत्री गोरे यांनी दिली होती, त्यावेळी धट यांनी आपल्यातील नेतृत्वगुणांची चुणुक म्हसवडकरांना दाखवुन दिली आहे. सर्वसामान्य जनतेसाठी रात्री, अपरात्री कोणीही कधीही फोन करुद्यात धट त्याठिकाणी हजर रहात असल्याचे आज ही सामान्य जनता आठवणीने सांगत आहे. धट यांच्यावर येथील सर्वसामान्य जनतेचे खुप प्रेम असल्यानेच ते सामान्यांचा हक्काचा कार्यकर्ता म्हणुन ओळखले जातात, शहरातील सर्वात जास्त युवा वर्ग पाठीशी असलेला हा कार्यकर्ता स्वत: च्या प्रचारासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहे. धट यांनी राजकारणापेक्षा समाजकारणालाच अधिक महत्व दिल्यानेच आज त्यांच्या नावाचा शहरात बोलबाला आहे. पक्षाचा अजेंडा व ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातुन शहरात झालेली विकासकामे ही सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम धट सध्या करीत आहेत.
माजी नगराध्यक्ष असलेले धट यांच्यावर खरेतर नेत्यांनी खुप मोठी जबाबदारी दिली असुन ते स्वत: च्या प्रचारासोबतच भाजपच्या इतर उमेदवारांसाठीही गृहभेटी करीत असुन प्रत्येक घरी धट यांचे होत असलेले स्वागत पाहुन धट यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर धट यांच्या प्रचाराचा मात्र शहरात धुरळा उडाल्याचे चित्र आहे.
