म्हसवड दि. २९
म्हसवड पालिका निवडणुक शांततेत व कायदेशीर पार पडावी यासाठी म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांना पोलीस स्टेशन हद्दीतुन हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती म्हसवडचे स.पो. नि. अक्षय सोनवणे यांनी दिली.
याबाबत स.पो. नि. सोनवणे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की म्हसवड शहरात दि.२ डिसेंबर रोजी पालिकेची निवडणुक होत आहे, ही निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे, मात्र या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबादीत रहावी यासाठी प्रशासकिय तथा उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे म्हसवड पोलीसांनी दिलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असुन म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील २३ सराईत गुन्हेगारांना हद्दपारीच्या नोटीस म्हसवड पोलीसांकडुन बजावण्यात आल्या आहेत. सदरच्या २३ जणांना दि.१ चे दि.३ रोजी रात्री १२ वा. पर्यंत म्हसवड पोलीस हद्दीतुन हद्दपार करण्यात आले असुन या काळात सदरच्या इसमांनी म्हसवड पालिका हद्दीत त्यांनी येवु नये अन्यथा कारवाई अटळ असल्याचा गंभीर इशारा स.पो. नि. सोनवणे यांनी दिला आहे.
सार्वत्रिक नगरपरिषद म्हसवड निवडणूक 2025 अनुषंगाने दिनांक 2/12/ 2025 रोजी मतदान होणार असून समाजात गैरवर्तन करणाऱ्या तसेच ज्यांच्यामुळे सामाजिक शांतता सलोखा बिघडू शकतो असे आरोपी सध्या जामीनवर मुक्त आहेत तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नाही व त्यांच्या हातून गंभीर स्वरूपाचा शरीराविरुद्धचा किंवा बेकायदेशीर जमाव जमवून शांतता सलोखा बिघडविण्याचा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून नमूद 23 आरोपींना सार्वत्रिक निवडणूक नगरपरिषद म्हसवड मतदार संघाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास व निवास करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालील प्रमाणे
दादासो किसन खुपकर, रावसाहेब रघुनाथ नरळे,मल्हारी पांडुरंग मदने,धनंजय दिनकर बनसोडे, पोपट रामचंद्र गायकवाड, अविनाश दादू सरतापे, अक्षय महादेव गोरड, विजय बाबा शिंदे, प्रवीण सुरेश गोरड, विशाल महादेव नलावडे, करण नवनाथ गोरड, समाधान सिदा गोरड, आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे, सुशांत दादा गोरड, दादा बाबुराव मदने,जयंत पोपट झिमल, नागेश सुरेश चव्हाण, समाधान विलास चव्हाण, दादासो पोपट गायकवाड, पोपट पांडुरंग शिंदे, बाजीराव रामा नरळे, दिलीप बाबुराव माने, विठ्ठल दिलीप मदने आदी जणांचा यामध्ये समावेश असुन या सर्व 23 आरोपींना मा. उपविभागीय दंडाधिकारी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर मॅडम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या प्रस्तावावरून निवडणूक कालावधीत तडीपार केले असून सदरची कारवाई ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी म्हसवड पोलीस स्टेशन अक्षय सोनवणे यांनी व प्रांतअधिकारी उज्वला गाडेकर मॅडम यांनी केली आहे.
