म्हसवड दि. २९
म्हसवड पालिका निवडणुकीत परिवर्तन पँनेलच्या नावाने खडे फोडणार्या भाजपने एक, एक, करीत अर्धे परिवर्तन पँनेल निवडणुकीत सोबत घेतले आहे, असे असताना आता परिवर्तन चा सेनापति लाही भाजपने मांडीवर घेतले आहे, मग परिवर्तन नक्की कोणाचे झाले असा सवाल जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
म्हसवड पालिका निवडणुकीच्या निमीत्ताने आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते, यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, प्रभाकर देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते, यावेळी देसाई बोलताना म्हणाले की आजवर विकासाच्या मुद्दयावर बोलताना मंत्री महोदयांनी म्हसवडकरांनी पालिकेत केलेल्या परिवर्तन वर नेहमी बोलत आले आहेत, परिवर्तन पँनेलने शहराचे वाटोळे केल्याचा नेहमीच आरोप त्यांनी केला आहे, तर शहराला भकास करुन विकासापासुन कोसो दुर ठेवल्याचाही घणाघात मंत्री महोदयांनी आजवर केला आहे. असे असताना पालिका निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी आजवर आपणाला साथ दिली त्यांना खड्यासारखे बाजुला करुन परिवर्तन मधीलच काहीजणांना सोबत घेत त्यांनाच उमेदवारी दिली, याचा अर्थ आपणाकडे तेवढ्या क्षमतेचे उमेदवार नाहीत का ? असा सवाल उपस्थित करीत देसाई पुढे म्हणाले की आतापर्यंत अर्धेहुन अधिक परिवर्तनवाले आपण मांडीवर घेवुन बसला आहात आतातर या परिवर्तन चा सेनापतीसुध्दा आपल्या सोबत आला आहे, याचा अर्थ परिवर्तन ने नक्कीच चांगले काम केले असावे. तर आज शहरातील रस्ते, विज व पाण्याची अत्यंत गंभीर परिस्थिती असुन आपण मंत्री झाल्यापासुन हे प्रश्न का सुटु शकले नाहीत याचेही उत्तर म्हसवडकर जनतेला द्यावे, आम्ही आज ही दहशतमुक्त व संस्कृत म्हसवड शहर बनवण्यासाठी लढत असुन या निवडणुकीत हा बदल सिध्दनाथ नागरिक आघाडीकडुन माध्यमातुन नक्कीच म्हसवडकर जनता घडवेल असा विश्वास देसाई यांनी शेवटी व्यक्त केला.०००
