म्हसवड दि. १
रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठीच, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र आहे, याच महाराष्ट्र च्या मातीने अनेक इतिहास घडवलेत, त्यामुळे म्हसवड पालिकेत ही नवा इतिहास घडणार आहे, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात हे लक्षात ठेवावे सामान्य जनतेला त्रास देवु नका सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी मी आहे हे ध्यानात घेवुन या आघाडीला पालिकेची सत्ता द्या मी शहर आदर्श बनवतो असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी म्हसवड येथे केले.
म्हसवड पालिका निवडणुकीच्या निमीत्ताने आयोजित केलेल्या सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते, यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, आ. उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी चे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभयसिंह जगताप, प्रा. कविता म्हेत्रे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भुवनेश्वरी राजेमाने या सह सर्व सदस्यपदाचे उमेदवार उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना. पवार म्हणाले की आताची पालिकेची सत्ता जर या आघाडीच्या ताब्यात दिली तर जसा बारामतीचा विकास झाला आहे, तसा विकास मी म्हसवड चा करुन दाखवतो, मी जे बोलतो ते करुन दाखवतो हा दादाचा शब्द आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी रहा असे आवाहन करताना ना. पवार पुढे म्हणाले की
समोरच्या पार्टीतच परिवर्तन पँनेल आहे, चोराच्या उलट्या बोंबा आहेत, एक परिवार म्हणुन सिध्दनाथ नागरिक आघाडी आपल्यासमोर आहे, हा पँनेल निवडुन द्या. उमेदवार म्हणुन स्वच्छ चारित्र्याचा व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना आम्ही उमेदवारी दिली आहे. राजेमाने कुटुंबातील भुवनेश्वरी राजेमाने यांना सामाजिक कार्याचा वारसा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या पँनेलच्या पाठीशी रहा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हे पँनेल सक्षम आहे. जिहे – कठापुर,योजनेसह तारळी, उरमोडी, वसना, वंगणा या सिंचन योजना निधी देवुन कार्यान्वित केल्या आहेत. भविष्य सक्षम बनवण्यासाठी आपण सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी रहा.
बारामती शहर रोल मॉडल आहे तसं म्हसवड बनवण्यासाठी आपण सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी रहा. मी विकास करुन दाखवलाय हे शक्य आहे त्यासाठी म्हसवडकरांनी साथ द्यावी, हे शहर ही विकासकामात अग्रेसर होईल. लेकींची लग्नासाठी बारामतीची पसंती आहे. तेथे झालेल्या विकासामुळेच बारामतीच्या बाजारपेठेला चालना मिळत आहे बारामती येथे सर्व सुविधा असल्यानेच हे शक्य आहे. त्यामुळे म्हसवड चाही विकास असाच होवु शकतो, सत्तेत आम्ही आहोत इच्छाशक्ति आहे तर फक्त एकदा या आघाडीला निवडुन द्या. सर्वांनी रुसवे, फुगवे, गट – तट बाजुला ठेवुन कार्यकर्त्यांनी शहराच्या विकासाला महत्व द्या एकदिलाने या आघाडीला निवडुन द्या मी तुमच्यासाठी विकासनिधी देतो, देशाला सर्वाधिक कर हे महाराष्ट्र देते याच निधीतुन शहराचा विकास होईल. माण तालुक्याने स्पर्धा परिक्षेतुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. माणची माती लढण्याची ताकत देते, येथील तरुणांच्या अंगात दिली आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता या मातीत आहे.
म्हसवड च्या विकासासाठी वेळप्रसंगी केंद्राचा निधी म्हसवड पालिकेला उपलब्ध करुन देवु असे आश्वासन ना. पवार यांनी शेवटी दिले. सत्तेची मस्ती कोणीही दाखवु नये, सत्तेचा ताम्रपट कोणी घेवुन आलेले नाही तेव्हा कोणीही सामान्य जनतेला दमदाटी व त्रास देवु नये, दमदाटी करणार्यांना सामान्य जनता कधीच जवळ करीत नाही, दमदाटी करु नका ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात, आरे ला का रे करण्याची आमचीही तयारी आहे. मात्र आम्हाला शहराला विकासाच्या उंचीवर न्यायचे आहे, शेतकरी हीच आमची जात आहे. सर्वांच्या पाठीशी मताचा आशीर्वाद द्या. आमचे पँनेल निवडुन आल्यावर दिलेला शब्द मी पुर्ण करण्याचे देतो. असे ही शेवटी उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले की दहशतमुक्त व धुळमुक्त म्हसवड शहर करण्यासाठी सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी रहा, पोलीसांनी कोणाच्या सांगण्यावरुन सामान्यांना त्रास देवु नये, मटका, दारुवाल्यांना आम्ही कोणाला उमेदवारी दिली नाही. सत्तेला लाथ मारणारा हा जानकर आहे. विधानसभेला आता आपण दिसणार नाही. पक्ष, दल बदलुंना आता बदलण्याची वेळ आली आहे. चांद्यापासुन ते बांद्यापर्यंत मी मंत्री असताना निधी दिला आहे. म्हसवडकर मी तुमच्या सोबत आहे. घाबरु नका जशास तसे उत्तर देणार.माझ्या म्हसवडच्या मातीसोबत मी आहे. कमळाला येथे गाढुन टाका, ओबीसी, मुस्लिम, दलितांना भाजपने नाडवले आहे त्यासाठी ही सिस्टम बदलावी लागेल. जिथं कमी तिथं आम्ही. भयमुक्त म्हसवड बनवण्यासाठी एकवेळ या आघाडीला संधी द्या. विजय नक्कीच या आघाडीचा होणार आहे, आता गुलाल सिध्दनाथ नागरिक आघाडी चा आहे. असे ही माजी मंत्री जानकर यांनी सांगितले.
यावेळी आ. उत्तमराव जानकर बोलताना म्हणाले की शहराचे नेतृत्व म्हसवडकरांना बदलायचाय, नवा इतिहास घडवायचाय, २० वर्ष आपण सत्तेत आहात तर मग म्हसवड शहरात कोणता विकास केला याचा हिशोब द्यावा. विरोध करणार्याला जेल मध्ये टाकले जातंय. पुर्वी भाजपची राष्ट्र प्रथम ही व्याख्या होती, आता भ्रष्ट प्रथम अन् मुस्लिम खतम ही नवीन व्याख्या आली आहे. म्हसवड – दहिवडीच्या मधोमध उपमुख्यमंत्र्यांनी जेल बांधावे, कारण येथील लोकप्रतिनिधी प्रत्येकावर खोट्या केसेस टाकुन जेल मध्ये टाकतोय. या सत्ताधार्यांनी राज्यात एक तरी नवीन धरण बांधले का, त्यातील गाळ तरी उपसलाय का या शासनाने. डॉ. संपदा मुंडे खुन खटल्यातील प्रमुख आरोपी हा माणचा आहे. विकासाचे काम न करता फक्त सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम आपण करीत आहे. ३ डिसेंबर ला सोलापुर जिल्ह्यात भाजपला भोपळाही फोडता आला नसल्याचे आपण पाहचाल. शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन असलेल्या या आघाडीला निवडुन द्या आवाहन आ. जानकर यांनी केले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी चे नेते प्रभाकर देशमुख म्हणाले की सामान्यांची सेवा हिच सिध्दनाथ नागरिक आघाडी चा अजेंडा आहे. शहराचे वाटोळे करणारे समोरच्या पार्टीत गेलेत त्यांना घरी बसवा. मी विविध शासकिय पदावर काम केलेय. पण मी पणा कधी आपल्यात येवु दिला नाही.जे वडुज, दहिवडी नगरपचांयतीत घडलय तेच म्हसवड पालिकेत होईल असा विश्वास आहे. म्हसवड च्या विकासावर बोलण्यापेक्षा आमच्यावर लक्ष लोकप्रतिनिधींचे आहे. गल्लीबोळात सामान्य जनता राहते त्यांच्या अडचणी जाणण्यासाठीच आम्ही गल्लीबोळात फिरतोय त्यांच्या समस्या जाणतोय, त्यांच्या व्यथा आपणाला काय माहिती आहे, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला. स्वच्छ, सुंदर शहर निर्माण करण्यासाठीच सिध्दनाथ नागरिक आघाडी ला निवडुन द्या असे आवाहन देशमुख यांनी केले.
यावेळी बोलताना अनिल देसाई यांनी चौफेर फटकेबाजी करीत मंत्री गोरे यांच्यावर टिकास्त्र सोच ले ते म्हणाले की म्हसवड चा सात बारा हा कोणाच्या बापाचा नाही तो राजेमाने परिवाराचा आहे, अन् तो वाटतोय कोण हा विचार आता सामान्य मतदारांनी करावा. नगराध्यक्ष पदासाठी कोटीच्या बोली लागल्या. जी व्यक्ती स्वत:च्या कार्यकर्त्यांना फसवते ते जनतेला नक्कीच फसवणार, आमचे सर्व उमेदवार हे सामान्य कुटुंबातील आहेत. एकीकडे धन शक्ति तर आमच्याकडे जनशक्ति आहे. परिवर्तन ची निम्मी टिम आपण घेतलेत.
अभयसिंह जगताप बोलताना म्हणाले की म्हसवड शहरात उद्योजक घडवावे लागतील, लोकप्रतिनिधी आज ही रस्ते, गटर, पिण्याचे पाणी यावर मते मागायला लागलेत, लिलावावर भाजपने तिकीटे दिली, निष्ठावंताना डावलले, म्हसवडचा निर्णय म्हसवडकर घेतील असे पँनेल निवडुन द्या.
अनिल देसाई यांनी बोलताना चैफेर फटकेबाजी करीत मंत्री गोरे यांच्यावर कडाडुन हल्ला चावला ते म्हणाले की म्हसवड चा सात बारा हा कोणाच्या बापाचा नाही तो राजेमाने परिवाराचा आहे, अन् तो वाटतोय कोण हा विचार आता सामान्य मतदारांनी करावा. नगराध्यक्ष पदासाठी कोटीच्या बोली लागली. जी व्यक्ती स्वत:च्या कार्यकर्त्यांना फसवते ते जनतेला नक्कीच फसवणार, आमचे सर्व उमेदवार हे सामान्य कुटुंबातील आहेत.एकीकडे धन शक्ति तर आमच्याकडे जनशक्ति आहे. परिवर्तन ची निम्मी टिम आपण घेतलेत.
यावेळी बोलताना प्रा. कविता म्हेत्रे म्हणाल्या की आमच्याकडे १ नं. वाले उमेदवार, दोन नं. वाले समोरच्या पार्टीत उमेदवार आहेत, परिवर्तन ची विचका गँग सध्या समोरच्या पार्टीत गेलेत. शाहु, फुले, आंबेडकर यांचे नुसते स्मारक उभे करुन विकास होत नाही, तर या महापुरुषांचे विचार सर्वांच्यात पेरणे तो विचार जगणे हा खरा विकास आहे. त्यांची शिकवण समाजाला देणे गरजेचे आहे. आपला गाव आपली माणसं, आपला कारभार आपल्याच हाती असावा, हजारो बाजारबुणग्यांपेक्षा मुठभर मावळे चांगले आज सर्व बुणगे तिकडे तर इकडे फक्त प्रामाणिक मावळे आहेत.भाजप ने जाती जातीत भांडणे लावतंय, सामान्यांची घरे पेटवतय, घरे पेटवण्यापेक्षा लोकांच्या घरच्या चुली पेटवा. दहशतमुक्त म्हसवड बनवण्यासाठी सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी रहा. असे आवाहन शेवटी प्रा. म्हेत्रे यांनी केले.
यावेळी मनोज पोळ, अँड. पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, किशोर सोनवणे, दिलीप तुपे, बाळासाहेब माने, बबनदादा विरकर, या सह बहुंसंख्य म्हसवडकर जनता उपस्थित होती.
चौकट
अजिनाथ केवटेमुळे म्हसवड बस स्थानक पुर्ण झाले –
म्हसवड पालिका निवडणुकीत म्हसवड एस.टी. बस स्थानक लोकप्रतिनिधी आपण पुर्ण केल्याचा दावा करीत आहेत, मात्र हे बस स्थानक त्यांच्यामुळे नाही तर येथील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी केलेल्या उपोषणामुळे पुर्ण झाले असल्याचे राष्ट्रवादी चे नेते प्रभाकर देशमुख यांनी जाहीरपणे सभेत सांगितले.
फोटो-


