Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
Uncategorized

नागोबा यात्रेचा शुक्रवारपासुन होणार प्रारंभ –

By adminmandand
December 3, 2025 2 Min Read
0

म्हसवड दि. ३
म्हसवड पालिका हद्दीतील धनगर समाजाचे आराध्य दैवत व लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या नागोबा देवाची यात्रा नामाच्या हरीच चांगभल..कोळ होळच्या राजाचं चांगलभलच्या जयघोषात दि.५ डिसेंबर पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार असल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या मार्फत देण्यात आली.
नागोबा यात्रा ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत भरणार आहे.या वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.५ डिसेंबर रोजी देवाची सासनाची पूजा व आरती करून यात्रेस सुरूवात होणार आहे.दि.५ व ६ रोजी रोजी शेळ्या-मेंढ्याचा बाजार मोठ्या प्रमाणात भरणार आहे.
सोमवार दि.८ डिसेंबर रोजी नागोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने भव्य निकालही कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. या आखाड्यात ५५ हजार रुपयांची प्रथम क्रमांकाची कुस्ती नागोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने लावण्लायात आली आहे. तर द्वितीय क्रमांकाची ५१ हजार रुपयांची कुस्ती लालासाहेब राजाराम विरकर शेठ,मसाईवाडी(जयपूर शेठ)यांच्या मार्फत तर तृतीय क्रमांकांची३१ हजार रुपयांची कुस्ती ढाकणीचे माजी सरपंच शंकर बाबू नरबट यांच्या वतीने लावण्यात आली आहे.चतुर्थ क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे बक्षीस तानाजी यशवंत विरकर, विश्वस्त लाडेवाडी यांचेकडून तर पाचव्या क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे बक्षीस बापूराव देवबा विरकर,मसाईवाडी यांचेकडून तर सहाव्या क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे बक्षीस बाबू विजय सातपुते शेठ,बोनेवाडी यांचेकडून त्याचबरोबर सातव्या क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे बक्षीस सावळा गुलाब विरार शेठ, जयपूर यांचेकडून तर आठव्या क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे बक्षीस दाजी बापू विरकर ( रूपाली ज्वेलर्स म्हसवड -बोनेवाडी)यांचेकडून तर नवव्या क्रमांका चे ११ हजार रुपयांचे बक्षीस शांती सुपर मार्केट म्हसवडचे मालक महेंद्र कुमार (बंडू शेठ) मोडासे यांच्या मार्फत लावण्यात आली आहेत.
७डिसेंबर ते १०डिसेंबर या कालावधीत जातीवंत जनावरांची यात्रा भरणार आहे.
मंगळवार दि.९ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीमध्ये नागोबा देवाच्या प्रांगणामध्ये विविध गावांचा गजीनृत्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. या गजीनृत्यामध्ये सातारा, सोलापूर,सांगली जिल्ह्यातील सुमारे 50 गजीनृत्य संघ सहभागी होणार आहेत. तर याच कालावधीत रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे.बुधवार दि.१० डिसेंबर रोजी कै.बाजी नामदेव विरकर यांच्या स्मरणार्थ गिरजाप्पा बाजी विरकर शेठ (नागेश गोल्ड रिफायनरी राजस्थान) यांच्या मार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवाची पाकाळणी गुरुवार दि.११ डिसेंबर रोजी होणार आसल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वरा खोत यांनी सांगितले. यावेळी किसन जठरे, मधुकर सरकारने, धर्मू खोत, तुळशीराम गोरड, तुकाराम विरकर, जिजाबा खोत, पांडुरंग विरकर (रोडके), शंकर विरकर (सर),रामा राखुंडे, बंडू विरकर, किसन ढम, वस्ताद विरकर, धनाजी विरकर, सूर्यकांत खोत, वामन विरकर, वस्ताद विरकर, पोपट झिमल, शहाजी खांडेकर, तानाजी विरकर, तुळशीराम गोरड, आदीसह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व यात्रा कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
श्री नागोबा येथे दि.५ डिसेंबर ते ११डिसेंबर या कालावधीमध्ये श्री नागोबा देवाची वार्षिक यात्रा नागोबा देवस्थान ट्रस्ट,माण तालुका मार्केट कमिटी,म्हसवड नगरपरिषद व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमान भरणार आहे. या यात्रेच्या नेटक्या नियोजनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.०००
यात्रेतील जागा वाटप ४ ते ५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Post Views: 3
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी म्हसवड पालिकेची सत्ता ताब्यात द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार –

Next

दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणुन मारहाण करुन पैसे घेवुन एकाचा पोबारा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • वारकऱ्याची सेवा हीच पांडुरंगाची सेवा……… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • क्रांतिवीर नागनाथअण्णा जयंती निमित्त म्हसवड मध्ये भव्य प्रभात फेरी.
  • क्रांतिवीर ज्ञानमंदिर हे पद्मभूषण अण्णांचे खरेखुरे स्मारक – कॉम्रेड बाळासाहेब नायकवडी
  • स्वातंत्र्यसैनिक हरी गोविंद रसाळ, हुतात्मा किसन विरकर यांचे स्मारक उभारावे; नगरपरिषदेत प्रतिमा लावाव्यात – नगरसेवक विजय धट यांची मागणी
  • मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद; खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme